अल्ला -हू -अकबर,जय हनुमान, हमको उजाला दे भगवान..! पेट्रोलची बाटली , गॅस सिलेंडरसह चक्क डि.पी वर बसून शेतकऱ्याचे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हातामध्ये डिझेल व पेट्रोल ची बॉटल घेऊन अन् कमरेला गॅस सिलेंडर बांधून एक शेतकरी थेट डि.पी. वर चढल्याची घटना औरंगाबादेत घडलीय. अल्ला हो अकबर जय हनुमान..सबको उजाला दे भगवान असं म्हणत या तरुण शेतकर्‍यानं हटके अंदाजात आंदोलन केलंय. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात चांगलाच व्हायरल झालं आहे.

युवा शेतकरी मंगेश साबळे यांनी फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात सकाळी नऊ वाजता एम एस ई बी च्या कार्यालयांमधील डीपी वरती चढून अनोखं आंदोलन केलंय.मंगेश या युवा शेतकऱ्याने प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासन निवेदनाची दखल घेत नसल्याने शेवटी वैतागलेल्या मंगेश म ने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

चिडलेला शेतकरी थेट चढला डि.पी. वर अन् नंतर..

एकीकडे डिझेलची दरवाढ, पेट्रोलची दरवाढ, खाद्यतेलाची दरवाढ, घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ आणि त्यामध्ये आता हे लोड शेडींग. आम्हा शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? काय परिस्थिती सरकारने आमच्यावर आणून ठेवली आहे? असं म्हणत मंगेशने सरकारचा निषेध केलाय.अर्धा ते पाऊण तास आंदोलन केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी मंगेश साबळे यांची समजूत घालत डीपी वरून खाली उतरवले. पाच दिवसांमध्ये लोडशेडिंगचा प्रश्न संपेल असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर सदर युवा शेतकरी शांत झाला.

आता काय आमचा जीव घेता काय…?
अल्ला -हू -अकबर….जय हनुमान… हमको उजाला दे भगवान… अरे कोणी लाईट देते का लाईट… कुणी पेट्रोल-डिझेल देता का कुणी गॅस देता का गॅस… असं म्हणत हा युवक इलेक्ट्रिक डीपी वर बसला. हिंदू मुस्लिम दंगा करून मारण्यापेक्षा जनसामान्यांची सेवा करून मरण कधीही बेहत्तर असतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला सांगितलंय.. जातीचे तेढ निर्माण करणारे राजकीय पुढारी आजच्या तरुणांचे भविष्य धोक्यात टाकतात. आज आम्हाला लाईट नाहीये मागच्या दोन वर्षांपासून आमच्या मुलांना शिक्षण नाहीये. आणि हे हिंदू -मुस्लिम करतायत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळं रात्री आमच्या घरात चोऱ्या होतायत. या चोरांची साथ महावितरण देत आहेत. सध्याच्या या परिस्थितीला कंटाळून मी इथे आलो आहे मात्र. इथले अभियंते म्हणत आहेत रात्रीचे लोड शेडींग बंद करणे आमच्या हातात नाही. ही लोकशाही आहे की हिटलरशाही? पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ केली आता काय आमचा जीव घेता काय? उरलं सुरलं चोरांना नेऊन देता काय? असं म्हणत रात्रीच लोड शेडींग बंद करण्यासाठी या तरुणाकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आले.