Agricultural Machinery : शेतीमध्ये दगड गोट्यांमुळे वैतागले आहात? ‘स्टोन पिकर मशीन’ करेल सोपे काम?

Agricultural Machinery For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला सर्वच क्षेत्रात यांत्रिकीकरण (Agricultural Machinery) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्यामुळे मानवी वेळ आणि श्रमामध्ये बचत झाली आहे. याला कृषिक्षेत्र देखील अपवाद नाही. अगदी छोट्या-मोठ्या कामासाठी सध्या शेतीमध्ये यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. शेताची पूर्वमशागत ते पिकांची काढणी इथपर्यंतचे कामे आता यंत्रामार्फत होऊ लागल्याने, शेतकऱ्यांच्या वेळेत आणि पैशामध्ये बऱ्यापैकी बचत होत आहे.शेती करीत असताना बऱ्याचदा शेतीमध्ये दगड आणि गोट्यांचे प्रमाण असल्यामुळे मशागत करण्यास खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. हे दगडगोटे वेचून बाहेर काढणे फार जिकिरीचे काम असते. परंतु आता चिंता करण्याची गरज नसून, यासाठी स्टोन पिकर मशीन (Agricultural Machinery) खूप उपयुक्त ठरत आहे. आज आपण या मशीनबाबत जाणून घेणार आहोत.

स्टोन पिकर मशीनची वैशिष्ट्ये (Agricultural Machinery For Farmers)

बरेच शेतकरी थोड्याशा डोंगराळ भागात शेती करतात. परंतु अशा ठिकाणी बऱ्याच प्रकारची दगड-गोटे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मशागत करण्यास अडचणी निर्माण होतात व यामुळे बियाण्याची उगवण क्षमता (Agricultural Machinery) देखील प्रभावित होते. अशी शेतातील दगडगोटे उचलणारी म्हणजेच स्टोन पिकर मशीन खूप उपयुक्त आहे. या यंत्राच्या साह्याने शेतातील बारीक दगड-गोटे देखील सहजपणे वेचून, आपले शेत व्यवस्थित स्वच्छ करता येते. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे छोटे आणि मोठ्या आकाराचे सगळ्या प्रकारचे दगडगोटे एकाच वेळेस उचलून घेते.

कसे काम करते हे यंत्र?

स्टोन पिकर मशीनला ऑपरेट करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असून, एका एकर क्षेत्रातील दगड गोटे दोन तासात उचलून देण्याची त्याची क्षमता असते. त्यामुळे शेतीची मशागत करणे सोपे होते व कमी कष्ट लागतात. छोटे-मोठे अशा सगळ्या प्रकारचे दगड गोटे यामुळे उचलता येणे शक्य आहे. शेतीची मशागत व्यवस्थित करता आल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. पिकांची गुणवत्ता देखील सुधारते व जमीन चांगली उत्पादनक्षम बनते.

किती आहे ‘या’ यंत्राची किंमत

बाजारामध्ये यंत्र जवळपास चार लाख रुपयांपर्यंत मिळते. यंत्राची मॅन्युफॅक्चरिंग पंजाब राज्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. जर तुम्हाला देखील हे यंत्र खरेदी करायचे असेल तर तुम्ही पंजाब राज्यातील खासगी कंपन्यांची याबाबतीत संपर्क करू शकतात एवढेच नाही तर आपल्याकडील काही खाजगी कंपन्या देखील या बाबतीत तुम्हाला माहिती पुरवू शकतात.