सोलापुरात साकारण्यात येणार अत्याधुनिक ॲग्रीकल्चरल टेस्टिंग लॅबोरेटरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या मूलभूत उन्नतीसाठी भारतातील तिसरी आणि सोलापूर जिल्ह्यातील पहिली सेंट्रल ॲग्रीकल्चरल टेस्टिंग लॅबोरेटरी साकारली जातेय. या लॅबमध्ये माती, पाणी, पान आणि देठ परिक्षण होणार आहे. सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, पीक पध्दती आणि उत्पादन वाढीच्या पध्दतीसाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळेची निर्मिती माढा तालुक्यात होत आहे.

या सेंट्रल ॲग्रीकल्चरल टेस्टिंग लॅबोरेटरीच्या भूमीपुजन समारंभ पार पडला. माढा वेलफेअर फाऊंडेशन, मुकुल माधव फाऊंडेशन आणि फिनोलेक्स यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपये खर्चून ही अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. या लॅबचे भूमीपूजनासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड, डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक संजीव मराठे, फिनोलेक्स कंपनीचे प्रदीप शास्त्री वेदुला, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे आदी मंडळी यावेळी उपस्थित होते.