Agriculture Decision : शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय!

Agriculture Decision For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Agriculture Decision) यांच्या अध्यक्षतेखीली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या बैठकीला उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही उपस्थित होते. यावेळी राज्यातील अन्य काही निर्णय (Agriculture Decision) देखील घेण्यात आले आहेत.

बैठकीतील शेतकऱ्यांसाठीचे निर्णय (Agriculture Decision For Farmers)

बांबू लागवड हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रॉजेक्ट असून, राज्यभरातील शेतकऱ्यांनी (Agriculture Decision) मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी. यासाठी राज्य सरकारकडून प्रोत्साहन देखील दिले जात आहे. त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय राज्यात सध्या मोठ्या मधुमक्षिका पालन व्यवसाय विस्तारतो आहे. या व्यवसायाला राज्यात आणखी बळकटी मिळावी यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरात ‘मधाचे गाव योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही निर्णयांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

अन्य महत्वाचे निर्णय

याशिवाय आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाकडून कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष, स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता, कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता, तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार, कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता असे शेतीशी संबंधित काही निर्णय देखील घेण्यात आले आहे. तसेच राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षावरील नागरिकांना लाभ देणार येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.