Agriculture Festival 2024: परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला शेतकर्‍यांचा वाढता प्रतिसाद; वनामकृविचे ड्रोन प्रात्यक्षिक आहे मुख्य आकर्षण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: परळी वैद्यनाथ ‘राज्यस्तरीय कृषी महोत्‍सव – 2024” (Agriculture Festival 2024) सुरू असून या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्‍या शुभहस्‍ते आणि केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितित झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्‍याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे हे होते.  

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे (Maharashtra Agriculture Universities) आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने विकसित तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याचा दृष्टीने दिनांक 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2024  या कालावधीत परळी वैद्यनाथ (Parli Vaijnath) येथे “परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्‍सव – 2024” (Agriculture Festival 2024) आयोजन करण्यात आले.

सदर महोत्‍सवानिमित्त आयोजित स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडपातील कृषि प्रदर्शनीत (Agriculture Festival 2024) राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे आणि खासगी कंपन्या यांच्‍या कृषि तंत्रज्ञान (Agriculture Technology) आधारीत 400 पेक्षा जास्त दालनाचा समावेश आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने (VNMKV Parbhani) या महोत्सवातील (Agriculture Festival 2024) प्रदर्शनामध्ये कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा दालने उभारली आहेत. या दालनांना शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद (Farmers Response) देत असून यामध्ये कृषी यंत्र व शक्ती विभागाचे कृषी यंत्र व शक्ती यांचे भव्य असे यंत्राचे दालन उभारले आहे. या दालनामध्ये ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक (Agriculture Drone Demonstration) ड्रोन पायलट सातत्याने दाखवित असून परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्‍सवातील (Agriculture Festival 2024) हे एक मुख्य आकर्षण ठरले आहे. या  प्रात्यक्षिकाला शेतकर्‍यांची आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी द्वारे कृषि क्षेत्रात शेतकर्‍यांना फवारणी वरील खर्च व वेळ वाचवावा याकरिता ड्रोनचा वापर करून विविध पिकातील कीड व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन यासाठी भाडे तत्वावर ड्रोन उपलब्ध व्हावेत व त्याची निगराणी व दुरूस्त तसेच शेतकरी युवा पिढीस स्मार्ट व प्रगतशील तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील कामे व स्वयंरोजगार निर्मिती करता यावी या दृष्टीकोनातून कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) संस्थांचे संचालक श्री. शंकर गोयंका यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे आणि या करारामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) यांचे संयुक्त विदयमाने कृषी क्षेत्रात भाडे तत्वावर फवारणी करिता ड्रोनची उपलब्धता माफक दारात करून देण्यात आली आहे. त्याबाबतीत शेतकर्‍यांना जास्तीत जास्त माहिती व्हावी म्हणून महोत्सवात सतत प्रात्यक्षिके सुरू असून त्याबाबतीत सविस्तर माहिती देण्यात येत आहे.

याबरोबरच महोत्सवात (Agriculture Festival 2024) विद्यापीठाने मराठवाड्यातील यशस्वी शेतकर्‍यांच्या यशोगाथा (Farmers Success Story) आणि शास्त्रज्ञांचे मार्गदर्शने आयोजित केले आहेत.