Agriculture Machinery : शेतकऱ्यांसाठी ‘हे’ आहेत तीन पॉवरफुल ट्रॅक्टर; वाचा…वैशिष्ट्ये, किंमत?

Agriculture Machinery For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीची कामे ही यंत्राच्या (Agriculture Machinery) साहाय्याने केली जातात. जमिनीच्या मशागतीचे कामे ही बैलांऐवजी ट्रॅक्टरने केली जात आहेत. नांगरणी असो, पेरणी, किंवा इतरी कामे यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. अनेक कंपन्यांनी आपले ट्रॅक्टर बाजारात आणले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेतकऱ्यांसाठी पॉवरफुल असलेल्या 3 ट्रॅक्टरबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या दणगट ट्रॅक्टरच्या मदतीने खरिपाची कामे झटपट उरकण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील ट्रॅक्टर (Agriculture Machinery) घेण्याचा विचार करत असाल तर हे तिन्ही ट्रॅक्टर तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

‘हे’ आहेत तीन पॉवरफुल ट्रॅक्टर (Agriculture Machinery For Farmers)

पॉवरट्रक युरो 50 ट्रॅक्टर : या ट्रॅक्टरमध्ये 3 सिलिंडर ट्रॅक्टर आणि 50 हॉर्स पॉवरचे (Agriculture Machinery) इंजिन असते. यात गिअरबॉक्स असून, या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता ही दोन हजार किलो आहे. या टॅक्टरची किंमतही 6.15 लाख ते 6.50 लाख रुपयांच्या दरम्यान असते. अधिक कार्यक्षमतेसाठी या ट्रॅक्टरमध्ये ड्र टाईप एअर फ्लिटर देण्यात आले आहे. यामुळे इंजिनला धुळविरहित हवा पुरवली जाते. यासह इंजिनने अधिक वेळ कार्यक्षम राहावे, यासाठी वॉटर किलिग सिस्टिम देण्यात आले आहे.

पॉवर इरो 50 या ट्रॅक्टरला डिजिटल मीटर देण्यात आले आहे. यासह ऑपरेटरच्या सोयीसाठी स्लाइडिंग सीट आणि बॉटल होल्डर देण्यात आले आहे. ड्युअल क्लच, मल्टी स्पीड पीटीओ आणि सेफ्टी न्यूट्रल स्विच की देण्यात आली आहे. यासह या ट्रॅक्टरची इंधन क्षमता ही 60 लिटरची आहे. पॉवरट्रक युरो 50 ट्रॅक्टरला 8 फॉरवर्ड गिअर आहेत आणि दोन मागचे गिअर देण्यात आले आहे. ड्युल क्लच पर्यायामुळे हे टॅक्टर शेतीच्या कामासाठी खूप उपयोगी आहे.

जॉन धीरे 5050 डी : या ट्रॅक्टरमध्ये ३ सिलिंडर आणि 50 हॉर्स पॉवर देण्यात आले आहे. याचे इंजिन हे 2900 सीसी आहे. या ट्रॅक्टरलाही पॉवरही स्टेअरिंग आहे, तर वजन उचलण्याची क्षमता ही 1600 किलोची आहे. या ट्रॅक्टरची किंमत ही 6.90 ते 7.40 लाख रुपयांपर्यंत आहे. या ट्रॅक्टरला इंजिन बॅकअप उच्च प्रतीचा देण्यात आला आहे. यामुळे रस्ताची कशीही परिस्थिती असली तरी वारंवार गिअर बदलण्याची गरज नाही. गिअर सिलेक्शनने इआरपीएमसह हे ट्रॅक्टर कमी गतीमध्येही चालण्यास सक्षम आहे.

जॉन धीरे 5050 डी या ट्रॅक्टरची लोकप्रियता (Agriculture Machinery) अधिक आहे. या ट्रॅक्टरला ३ सिलिंडर आणि 48 हॉर्स पॉवर देण्यात आले आहे. 1500 किलो पर्यंतची वजन हे ट्रॅक्टर पेलू शकते. या ट्रॅक्टरची किंमत 6.20 पासून ते 6.50 लाख पर्यंत आहे. या ट्रॅक्टरला पॉवर स्टेअरिंग देण्यात आली आहे. स्वराज 744 ट्रॅक्टर बाह्य घटक असलेल्या हायड्रॉलिक साधनांसोबतही चांगले काम करते. या ट्रॅक्टरच्या देखभालीचा खर्च हा कमी आहे. इंधन क्षमता अधिक आहे. या ट्रॅक्टरची गती ही प्रतितास 34.5 किमी आहे. या ट्रॅक्टरची किंमत ही 6.40 ते 6.70 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

आयशर ट्रॅक्टर 557 : या ट्रॅक्टरमध्ये तीन सिलिंडर आणि 50 हॉर्स पॉवर आहे. यात 3300 सीसीचे सिलिंडर देण्यात आली आहे. यामुळे शेतीचे कामे व्यवस्थितपणे करता येतात. या ट्रॅक्टरला पॉवर स्टेअरिंग देण्यात आली असून वजन, उचलण्याची क्षमता ही 1470 ते 1850 किलोपर्यंतची आहे. या ट्रॅक्टरची किंमतही 6.35 लाखापासून ते 6.70 लाखापर्यंत आहे.