हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या तुरीला चांगले भाव (Bajar Bhav) असले तरी शेतकर्यांजवळ विक्रीसाठी साठा नसल्यामुळे तुरीची आवक मंदावली आहे. गतवर्षी पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीच्या उत्पादन निम्म्याहून कमी झाले आले. परिणामी, बाजारात आवक कमी राहिली. त्यामुळे भाव समाधानकारक मिळाला. सध्याही तुरीला दरवाढीची (Tur Bajarbhav) चमक कायम आहे. परंतु, विक्रीसाठी तूरच शिल्लक नसल्याने आवक मंदावली आहे.
हिंगोली जिल्ह्यात (Hingoli Market) सोयाबीन, हळद, कापूस पाठोपाठ तुरीचा पेरा होतो. परंतु, गत दोन वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने तुरीच्या उत्पादनात (Tur Production) घट होत आहे. गेल्यावर्षी तर निम्म्याखाली उत्पादन आले (Bajar Bhav).
त्यामुळे बाजार समितीच्या (Bajar Samiti) मोंढ्यात आवक तुलनेने कमीच राहिली. परंतु, भाव (Bajar Bhav) समाधानकारक मिळाला. मे, जूनमध्ये 9 ते 10 हजारांचा भाव मिळाला. त्यावेळी सरासरी 200 ते 250 क्विंटलची आवक होत होती. आता मात्र शेतकर्यांकडे तूर शिल्लक राहलेली नाही.
त्यामुळे मोंढ्यात आवक मंदावली असून, 50 क्विंटलच्या आतच तूर विक्रीसाठी येत आहे. आवक मंदावल्यामुळे मात्र भाव (Bajar Bhav) वधारल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या 10 हजार ते 11 हजार 200 रुपये क्विंटलने विक्री होत आहे. भाव चांगला मिळत असला तरी सध्या तूर विक्रीसाठी शिल्लक नसल्याने या भाववाढीचा फायदा होत नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
हळदीच्या भावातही घसरण
मे, जूनमध्ये सरासरी 16 हजार रूपयांचा भाव (Turmeric Rate) मिळालेली हळद सध्या 14 हजार रुपयाखाली घसरली आहे. परिणामी, मार्केट यार्डात आवक मंदावली आहे. समाधानकारक भाव मिळत असताना ज्या शेतकर्यांनी आणखी भाववाढीची आशा केली त्यांना फटका बसला आहे. येणार्या दिवसांतही हळदीचे भाव (Bajar Bhav) वाढतील याची शाश्वती व्यापारी देत नसल्याने शेतकरी द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत.
सोयाबीन पडत्या भावात
आज उद्या भाव वाढतील या आशेवर शेतकर्यांनी सात ते आठ महिन्यांपासून सोयाबीन विक्रीविना ठेवले. मात्र, अजूनही दरकोंडी कायम असून, यंदा सोयाबीन विक्रीतून लागवडही वसूल झाला नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. किमान 6 हजार रूपयांचा भाव (Soybean Rate) मिळणे अपेक्षित होते.
मात्र, सोयाबीनने पाच हजाराचा पल्लाही गाठला नाही. सध्या मोंढ्यात 4 हजार 90 ते 4 हजार 400 रुपये क्विंटलचा भाव (Bajar Bhav) मिळत आहे. तर आवक सरासरी 400 क्विंटल होत आहे.