Import Duty On Orange: बांग्लादेशने संत्र्यावरील आयात शुल्क वाढविले; संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: नागपूरी संत्र्यावरील आयात शुल्कामध्ये (Import Duty On Orange) बांगलादेश सरकारने (Bangladesh Government) पाच वर्षांत 505 टक्के तर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 114.77 टक्क्यांनी वाढ केली आहे. वाढत्या आयात शुल्कामुळे यावर्षी बांगलादेशातील संत्रा निर्यात (Orange Export) आणखी मंदावणार आहेत. दुसरीकडे, देशाअंतर्गत बाजारात संत्रा विक्रीचे (Orange Crop) प्रभावी नेटवर्क नसल्याने आगामी हंगामात संत्र्याचे दर दबावात राहण्याची व संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.

विदर्भातील (Vidarbha) 1 लाख 60 हजार हेक्टर मधील संत्रा बागा उत्पादनक्षम आहेत. या बागांपासून दरवर्षी किमान 7.50 ते 8 लाख टन संत्र्याचे उत्पादन होत असून, यात सरासरी 4.50 ते 5 लाख टन आंबिया आणि 2.50 ते 3 लाख टन मृग बहाराच्या संत्र्याचा समावेश आहे. सन 2019-20 पर्यंत यातील सरासरी 2 ते 2.50 लाख टन संत्र्याची निर्यात (Import Duty On Orange) व्हायची. यातील किमान 1.75 लाख टन संत्रा बांगलादेशात निर्यात व्हायचा.

केंद्र सरकारच्या (Central Government) शेतमाल निर्यातबंदी (Agricultural Export Ban) धोरणामुळे अडचणीत आलेल्या बांगलादेशने ऑक्टोबर 2019 मध्ये पहिल्यांदा संत्र्यावर 20 टका प्रति किलो आयात शुल्क (Import Duty On Orange) लावला. यात वर्षागणिक वाढ करण्यात आल्याने सन 2024 मध्ये हा आयात शुल्क 101 टका प्रति किलो करण्यात आला आहे. बांगलादेशातील सामान्य ग्राहकांना 60 ते 80 टका प्रति किलो संत्रा खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडते. आयात शुल्कामुळे (Import Duty On Orange) हा 161 ते 181 टका प्रति किलो होणार असून, हा दर त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ते इच्छा असूनही नागपूरी संत्रा (Nagpuri Orange) खरेदी करणार नाहीत. बांगलादेशात संत्र्याची मागणी असूनही विक्री होणार नसल्याने निर्यात आणखी मंदावणार आहे. याचा विपरीत परिणाम संत्र्याच्या दरावर (Orange Rate) होणार आहे.

संत्रा निर्यातीला ब्रेक

नागपूरी संत्र्याच्या बांगलादेशातील निर्यातीला सन 2021-22 मध्ये ब्रेक लागला. ही निर्यात पूर्ववत करणे व वाढविण्यासाठी तसेच देशाअंतर्गत बाजारात नागपूरी संत्र्याची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अजूनही प्रभावी उपाय योजना करायला तयार नाहीत. याचा फायदा काही व्यापारी घेतात. देशाअंतर्गत बाजारात संत्रा विक्रीचे प्रभावी नेटवर्क नसल्याने शेतकर्‍यांना 15 ते 20 रुपये प्रति किलो दराने संत्रा विकावा लागत असून, हाच संत्रा ग्राहकांना 60 ते 80 रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा लागतो.

नागपूरी संत्र्याला सरासरी 30 ते 35 हजार रुपये प्रति टन भाव मिळायला हवा. सन 2022 मध्ये काही शेतकर्‍यांना 48 हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला होता. मध्यंतरी संत्र्याचे दर 50 ते 60 हजार रुपये प्रति टनावर गेले होते. संत्र्याचे योग्य मार्केटिंग आणि विक्री नेटवर्क निर्माण केल्यास हा दर मिळणे कठीण नाही.