BASF Pesticides : बास्फचे नवीन कीटकनाशक ‘इफिकॉन’ भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध!

BASF Pesticides For Indian Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जर्मनीतील बहुराष्ट्रीय कंपनी बीएएसएफने (बास्फ) (BASF Pesticides) भारतीय शेतकऱ्यांसाठी ‘इफिकॉन’ नावाचे नवीन, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कीटकनाशक बाजारात आणले आहे. ‘इफिकॉन’ हे रसशोषक किडींपासून पिकांचे संरक्षण करते. हे कीटकनाशक प्रामुख्याने कापूस, भाजीपाला आणि इतर अनेक पिकांसाठी प्रभावी आहे. असा दावा बीएएसएफ कीटकनाशक कंपनीकडून (BASF Pesticides) करण्यात आला आहे.

‘या’ पिकांसाठी आहे गुणकारी (BASF Pesticides For Indian Farmers)

भारत हा कापूस आणि भाजीपाला उत्पादनात आघाडीवर आहे. परंतु, रसशोषक किडीमुळे या पिकांच्या उत्पादनात 35 ते 40 टक्क्यांपर्यंत घट येते. ‘इफिकॉन’ हे नवीन कीटकनाशक (BASF Pesticides) या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. ‘इफिकॉन’ हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. ज्यामध्ये ॲक्सालिऑन (डिमप्रॉपीरायडॅझ १२ एसएल) हा मुख्य घटक आहे. हे कीटकनाशक मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी यांच्या विविध वाढीच्या अवस्थेत नियंत्रण करते. हे कीटकनाशक कापूस, हिरवी मिरची, टोमॅटो, वांगी आणि काकडी यासारख्या पिकांसाठी शिफारस करण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांसाठी शाश्वत उपाययोजना

“जागतिक लोकसंख्या वाढत आहे आणि हवामान बदल, दुष्काळ आणि तापमान यासारख्या अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत अन्नसुरक्षा निर्माण करण्यासाठी आणि जगभरातील शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बीएएसएफ शाश्वत उपाय विकसित करण्यासाठी आपले संशोधन कौशल्य वापरत आहे.” असे बीएएसएफचे ‘ग्लोबल स्ट्रॅटेजिक मार्केटिंग’ विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. मार्को ग्रोझडॅनोव्हिक यांनी सांगितले आहे.

उत्पादन वाढवण्यास होईल मदत

‘इफिकॉन’ हे बीएएसएफच्या नवीन तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे. ऑस्ट्रेलिया आणि कोरियानंतर हे कीटकनाशक आता भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. बीएएसएफ विविध भागीदारी संस्थांसोबत काम करत आहे. तसेच विविध गुणधर्माच्या पीक जाती, बियाणे आणि डिजिटल तंत्रज्ञानातही संशोधन करत आहे. ‘इफिकॉन’ हे भारतीय शेतकऱ्यांसाठी एक मौल्यवान साधन आहे. जे त्यांना रसशोषक किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यास आणि उत्पादन वाढवण्यास मदत करेल. असेही त्यांनी म्हटले आहे.