हॅलो कृषी ऑनलाईन (Bedana Production) : सांगली जिल्ह्यात बेदाण्याचे अधिक उत्पादन होते. हे उत्पादन सुरुवातीला अगदी धीम्या गतीने पहायला मिळत होते. मात्र आता या गतीत वाढ झाली आहे. राज्यातील बेदाणा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाच्या हंगामात २ लाख २० हजार ते २ लाख ३० हजार टन बेदाण्याचे उत्पादन होणार आहे.
मागील वर्षात केवळ १ लाख ८० हजार टन बेदाण्याचे उत्पादन घेतले गेले. यंदा बेदाणा उत्पादनासाठी उशीर झाल्याने यंदा द्राक्षाला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी बेदाणे तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांचा बेदाणा तयार करण्याकडे कल वाढला आहे. यामुळे आता सांगलीसह अन्य भागात बेदाणे पीक घेण्यासाठी तयारी सुरु आहे.
कवठे महांकाळ तालुक्यातील काही गावात जवळ जवळ तीन हजारांहून अधिक बेदाणा शेड उभारले गेले आहेत. एप्रिलच्या अखेरपर्यंत बेदाणा निर्मिती सुरू राहील, अशी शक्यता बेदाणा मालकांनी वर्तवली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बेदाण्याचे उत्पादन जवळजवळ ४० ते ५० हाजार टनांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. तसेच यंदाच्या बेदाण्याचे दर प्रति कीलोने खाली नमूद करण्यात आले आहेत.
जात दर
हिरवा बेदाणा – १५० ते २००
पिवळा बेदाणा – १५० ते १९०
काळा बेदाणा – ३० ते ६०