Biyane Anudan Yojana: बियाणे वितरण अनुदान योजना 2024; जाणून घ्या सविस्तर माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत बियाणे वितरण अनुदान (Biyane Anudan Yojana) 2024 योजने संबंधित माहिती जाणून घेऊ या.

महाडीबीटी (Mahadbt) पोर्टल योजना 2024: केंद्र शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत समाविष्ट जिल्हे आणि पिके –

भरड धान्य – (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).

गहू – सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)

पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)

भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)

कडधान्य – सर्व जिल्हे

अ) बाजरी – नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)

ब)ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)

क) ऊस – (औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड.

ड) कापूस – (अमरावती विभाग) – अमरावती, वाशिम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ.

(नागपूर विभाग) – वर्धा,नागपूर,चंद्रपूर.

इ) रागी – ठाणे (पालघर सह), नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे) (लातूर विभाग) – उस्मानाबाद,नांदेड, लातूर,परभणी, हिंगोली.

महाडीबीटी पोर्टल योजना 2024 बियाणे वितरण योजनेसाठी (Seed Subsidy Scheme) आवश्यक पात्रता

  • जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी, कापूस, ऊस या अंतर्गत कोणत्याही घटकासाठी अर्ज करत असेल, तर वर दिलेले जिल्हे त्यासाठी अनिवार्य आहेत.
  • शेतकरी (Farmer) अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याला या पीक योजने अंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्या शेतात गळीत धान्य पीक असणे आवश्यक आहे आणि जर वृक्ष तेलबिया पीक या मधून लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या स्वत:च्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.

बियाणे वितरण अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required For Biyane Anudan Yojana)

  • अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र
  • 7/12 उतारा
  • 8-अ प्रमाणपत्र
  • पूर्व संमती पत्र
  • हमीपत्र

योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसे करायचे? (Application For Biyane Anudan Yojana)

  • बियाणे अनुदान योजना मिळवण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर (Mahadbt Portal) यायचे आहे. या पोर्टल वर आल्यानंतर सुरुवातीला तुमची प्रोफाईल बनवावे लागेल (खाते बनवावे लागेल ).
  • खाते बनवताना तुमचे नाव, पॅन कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड, आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक हे सर्व लागेल यासोबतच जमिनीचे उतारे सुद्धा लागतील.
  • प्रोफाईल बनवल्यानंतर तुम्ही अर्ज करा ऑप्शन निवडा.
  • अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ” बियाणे अनुदान योजना ” ऑप्शन दिसेल यावर क्लिक करा.
  • कोणत्या पिकासाठी पाहिजे, तसेच किती पिकासाठी पाहिजे ते भरायचे आहे.
  • एक एक भरल्यानंतर तुम्ही त्याला प्रायोरिटी द्यायची आहे तसेच आवश्यक असणारे पेमेंट 23.60 रुपये त्यामध्ये भरायचे आहे/
  • यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन कृषी विभाग कडे भरला जाईल.
  • एकदा अर्ज भरल्यानंतर काही दिवसातच तुमचे विभागातील कृषी सहाय्यक जे अधिकारी असतील ते तुम्हाला संपर्क करतील किंवा तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा.
  • बियाणे अनुदान (Biyane Anudan Yojana) पॅकिंग पिशव्या तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये काही दिवसातच दिले जाईल.

अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: महाडीबीटी पोर्टल

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.