‘या’ औषधी वनस्पतीच्या शेतीतून मिळेल लाखोंचा नफा; कमी खर्चामधील शेतीचा उत्तम पर्याय

Bramhi Medicinal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । सरकार सातत्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळेच पारंपारिक शेतीपेक्षा वेगळी शेती करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी सरकार चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना फळे, भाज्या व औषधी वनस्पतींची लागवड करण्यास प्रोत्साहित करीत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीचा खर्च कमी आणि कमाई जास्त आहे. याशिवाय त्यांचे उत्पादन कमी असल्याने मागणी नेहमीच कायम राहते आणि शेतकर्‍यांना चांगला भाव मिळतो.

ब्राह्मी हे एक औषधी पीक आहे. ब्रह्मीची शेती करुन शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. भारतातील बहुतेक सर्व राज्यांमध्ये याची लागवड केली जाते. स्मृती वाढविण्यात ब्राह्मी उपयोगी ठरते. याशिवाय संधिवात, अशक्तपणा, दमा इत्यादी आजारांच्या उपचारामध्ये याचा उपयोग होतो. ब्राह्मीची लागवड करणारे शेतकरी म्हणतात की 1 हेक्टरमध्ये 25 ते 30 क्विंटल ब्राह्मीची कोरडी पाने निघतात.

आपण ते थेट बाजारात विकू शकता. परंतु आपण त्याची पावडर बनवून आणि मग ती विकली तर आपल्याला खूप नफा मिळतो. कारण त्याची पावडर बाजारात खूप महागात मिळते. शेतकरी बांधव ही लागवड करुन चांगला नफा कमवू शकतात. सरकार शेतकर्‍यांना औषधी पिके घेण्यास प्रोत्साहित करीत आहे. बाजारात त्याची मागणी नेहमीच असते आणि चांगले दर देखील उपलब्ध असतात. म्हणून आपण औषधी वनस्पतींची लागवड करू शकतो.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

https://chat.whatsapp.com/KzJiHgVregE3FOlwpDTyW