हॅलो कृषी ऑनलाईन: ट्रॅक्टर (Tractor Tires) हे शेतकर्यांसाठी महत्त्वाचे कृषी यंत्र (Important Agricultural Machinery) आहे. शेतीची कामे (Agriculture Work) ट्रॅक्टरने कमी वेळेत आणि कमी श्रमात सहज पूर्ण करता येतात. एवढेच नाही तर ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतीचा खर्चही कमी होतो आणि शेतकर्यांच्या (Farmers) नफाही वाढतो.
प्रत्येक शेतकर्याला एक चांगला ट्रॅक्टर (Tractor) हवा असतो ज्यामुळे त्याची शेतीची कामे सहज पूर्ण करता येतील. परंतु शेतकरी वारंवार तक्रार करतात की त्यांचे ट्रॅक्टरचे टायर (Tractor Tires) लवकर खराब होतात आणि त्यांना वारंवार टायर बदलावे लागतात, जे महागडे असते.
ट्रॅक्टरच्या टायर्सशी (Tractor Tires) संबंधित समस्या सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला टायरच्या देखभालीसंबंधी 5 गोष्टींची माहिती देत आहोत जेणेकरुन ट्रॅक्टरचे टायर लवकर खराब होणार नाहीत आणि ते जास्त काळ टिकतील.
ट्रॅक्टरचे टायर (Tractor Tires) लवकर खराब होण्याचे कारण म्हणजे त्यांची योग्य काळजी न घेणे. आपण ट्रॅक्टरची काळजी घेतो आणि तो चकचकीत ठेवतो पण टायर्सबाबत आपण एवढी काळजी घेत नाहीत. टायर्सची योग्य काळजी घेतली तर आपण ट्रॅक्टर जास्त काळ चालवू शकतो. यामुळे टायर वारंवार बदलण्याचा खर्च कमी होईल आणि टायर वर्षानुवर्षे (Tractor Tire Lifespan) टिकतील.
टायर्सची काळजी घेण्याबाबत लक्षात ठेवायच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी (Care And Maintenance Of Tractor Tires)
- शेतीच्या कामानंतर ट्रॅक्टर पार्क करताना त्यापूर्वी ट्रॅक्टरचे टायर साफ करून घ्या. टायरमधील माती, खडे, खिळे, लोखंडी तारा, झाडाचे काटे काढून टाका आणि पाण्याने टायर व्यवस्थित स्वच्छ करा आणि मगच ट्रॅक्टर पार्क करा.
- जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रॅक्टरने जड काम करावे लागते तेव्हा प्रथम टायरमधील हवेचा दाब (Tractor Tire Air Pressure) तपासा जेणेकरुन तुम्हाला कामाच्या दरम्यान समस्या येऊ नयेत. ट्रॅक्टर बराच वेळ उभा असेल तर त्याच्या टायरमधील हवा नक्की तपासा. हवा कमी असल्यास योग्य प्रमाणात भरा.
- टायर रिम आणि व्हॉल्व्ह यामध्ये वेळोवेळी वंगण घातले असल्याची खात्री करा, यासाठी मशीन ऑइल वापरा. विशेषतः पावसाळ्यात हे करा, कारण यावेळी गंजण्याची समस्या असते.
- ट्रॅक्टर अशा प्रकारे चालवा की घसरणार नाही. कारण घसरण्याने टायर (Tractor Tires) लवकर खराब होतात. याशिवाय, विनाकारण वारंवार ब्रेक लावणे देखील टाळावे कारण वारंवार ब्रेक लावल्याने देखील टायर घासले जातात.
- नेहमी चांगल्या कंपनीचेच (Good Quality Tractor Tire) टायर वापरा. हे महाग असले तरी वर्षानुवर्षे टिकतात. तर लोकल कंपनीचे टायर लवकर खराब होतात त्यामुळे टायर वारंवार बदलावे लागतात.