हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात तुफान पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे महापूर आणि भूस्खलनाच्या अनेक घटना घडून मोठे नुकसान राज्यात झाले आहे. अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे . या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्याखाली गेले आहे. मात्र केंद्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना 700 कोटींची मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती मंगळवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी लोकसभेत बोलताना दिली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी भुस्खलन झाले आहे, अनेकांच्या शेतातील पिके वाहून गेल्याने राज्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाले आहे. अशावेळी केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतीसाठी 700 कोटींची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत याबाबतची माहिती मंगळवारी दिली.
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून 700 कोटी
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्राला देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती दिली ते म्हणाले, पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असे तोमर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत 700 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती तोमर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना ही मदत पीक विमा योजनेअंतर्गत ही मदत दिली जाईल, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जी माहिती केंद्राला दिली गेली. केंद्राने आतंर मंत्रालयीन समिती बनवली, समितीने राज्यातील अधिकाऱ्यासोबत दौरा केला. तो दौरा केल्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी 701 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याचे नरेंद्र तोमर म्हणाले आहेत. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात तुफान पाऊस झाला. इतका पाऊस झाला की कोकणातल्या विविध शहरांत महापूर आला. गावंच्या गावं पाण्यात डुबून गेली. कित्येक घरांवर दरड कोसळल्या असे ते म्हणाले. आता शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्राने तब्बल 700 कोटी रुपयांची घोषणा केली आहे.