शेतकऱ्यांना मिळतंय तिखट मिरचीचं गोड फळ ! हिरव्या मिरचीचा तोरा कायम, दर प्रति क्विंटल कमाल 8000 रुपयांवर

Green Chilli
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या महिन्यापासून लिंबू आणि हिरवी मिरची यांचे दर तेजीत आहेत. राज्यातल्या वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हिरव्या मिरचीला चांगला दर मिळतो आहे. गुरुवारी अहमदनगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्‍न बाजार समितीत हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल साठी कमाल ८००० रुपयांचा भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत हिरव्या मिरचीची गुरुवारी ७७ क्विंटल इतकी आवक झाली. येथे सर्वसाधारण दर ३०००- ५५०० इतका मिळतो आहे.

हिरव्या मिरचीला मिळतोय चांगला दर
दरम्यान राज्यातल्या काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीला चांगला दर मिळतो आहे. हा दर कमाल आठ हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. खेड चाकण येथील बाजार समितीमध्ये गुरुवारी हिरव्या मिरचीला तब्बल नऊ हजार रुपयांचा दर प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. तर कोल्हापूर,पुणे, राहता, पुणे- मांजरी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये देखील हिरव्या मिरचीला कमाल दर आठ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.

सध्या इतर कुठल्या शेतमालापेक्षा लिंबू , काकडी ,हिरवी मिरची यांचे दर तेजीत आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे. मुळात मिरचीचे उत्पादन घेताना पिकांची खूप काळजी घ्यावी लागते. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झालेली पहायला मिळाली. शिवाय यंदा लाल मिरचीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना जरी थोडे जादा पैसे मोजावे लागत असले तरी शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या कष्टाचे फळ मिळत आहे.

हिरव्या मिरचीचे ताजे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/04/2022
भुसावळक्विंटल3710071007100
पुणेलोकलक्विंटल1060350080005750
पुणे-मोशीलोकलक्विंटल84400060005000
14/04/2022
कोल्हापूरक्विंटल65500080006500
पुणे-मांजरीक्विंटल3500080006500
खेड-चाकणक्विंटल265700090008000
भुसावळक्विंटल3500050005000
मंगळवेढाक्विंटल30350065005000
राहताक्विंटल11650080007000
पुणेलोकलक्विंटल665400080006000
कामठीलोकलक्विंटल4200030002800