Cow Breeds: कमीत कमी आहारात जास्त दूध देणारी ‘राठी गाय’! जाणून घ्या वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतामध्ये पशुपालन व्यवसाय (Cow Breeds) मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पशुपालन व्यवसायात (Animal Husbandry) दूध उत्पादन (Milk Production) हे आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पशुपालनामध्ये गाई (Cow Breeds) मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात.

आपल्याला माहित आहेच की, गाईंच्या अनेक प्रकारच्या जाती (Cow Breeds) भारतात आहेत. त्यापैकी काही देशी तर काही संकरित प्रकारच्या आहेत.

प्रत्येक जातीचे वेगवेगळे वैशिष्ट्य असून दूध देण्याची क्षमता देखील वेगवेगळे आहे. या लेखामध्ये आपण गायीच्या अशाच एका जातीबद्दल माहिती घेणार आहोत. जी कमीत कमी आहारात सुद्धा सर्वाधिक दूध देण्यासाठी ओळखली जाते.

कमीत कमी आहारात जास्त दूध देणारी ‘राठी गाय’ (Cow Breeds)

अनेक प्रकारच्या जाती गाईंच्या आहेत परंतु यामध्ये राठी गाय (Rathi Cow) आहे ही एक फार महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर जात आहे. सर्वाधिक दूध देणारी गाय म्हणून तिला सगळीकडे ओळखले जाते.

या जातीच्या गाई (Rathi Cattle Breed) मुख्यत्वेकरून राजस्थानच्या बिकानेर पासून ते पंजाब राज्याच्या सीमेपर्यंतच्या प्रदेशात आढळतात. याच गाईंना राजस्थानमध्ये कामधेनु असे देखील म्हटले जाते. या गाईच्या गुणधर्मांचा विचार केला तर साहिवाल जातीच्या गायीशी मिळते जुळते या गायीचे गुणधर्म आहेत.

इतर जातींच्या गाई (Cow Breeds) पेक्षा दूध देण्याची क्षमता जास्त असते. जर वातावरण पोषक असेल तर पशुपालक या गाईपासून जास्त दुधाचे उत्पन्न मिळवू शकतात.

अगदी कमीत कमी आहारात जास्तीत जास्त दूध देण्याची क्षमता या गाई मध्ये आहे. राठी गाईचे दूध देण्याची क्षमता प्रति वेताला 1062 ते 2810 दहा लिटर असते. जर आपल्याला गाईची निवड करण्याची कसब असेल तर आपण अधिक दूध उत्पादन करू शकता.

प्रतिदिन या गाई आठ ते दहा लिटर दूध देत असतात. परंतु आपण जर समतोल आणि पौष्टिक आहार या गायींना खायला दिला तर 25 ते 30 लिटरपर्यंत क्षमता दूध देण्याची या गाईंची आहे.

राठी गायीचे वैशिष्ट्ये

  • या गाई दिसायला आकर्षक असून चेहरा रूंद असतो तसेच या गाईंचा आकार मध्यम स्वरुपाचा असतो. गाईच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. तसेच शिंगे मध्यम आकाराचे असून मागे वळलेली असतात.
  • शेपटी लांब असून वय झालेल्या गाईंचे वजन हे साधारण 280 ते 300 किलोग्रॅम असते. या गाईंच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कोणत्याही वातावरणात आणि परिसरात राहू शकतात.
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.