Cucumber Variety: ‘ही’ आहे काकडीची जास्त उत्पन्न देणारी जात! जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात जवळपास सर्व राज्यात काकडीची (Cucumber Variety) लागवड केली जाते. उत्तरेकडील मैदानी भागात, वसंत ऋतु-उन्हाळा आणि खरीप हंगामात शेतकरी साधारणपणे दरवर्षी दोन काकडीची पिके (Cucumber Crop) घेतात. ग्राहक सामान्यत: जास्त उत्पादन क्षमता असलेल्या लांब, दंड गोलाकार आणि मध्यम जाड काकडी खरेदीला प्राधान्य देतात. आज आपण ज्या काकडीच्या जातीची माहिती घेणार आहोत ती अधिक उत्पन्न देणारी जात (Cucumber Variety) आहे. जाणून घेऊ याबद्दल सविस्तर.  

‘पुसा लाँग ग्रीन’ काकडी (Pusa Long Green Cucumber)

ही उच्च-उत्पन्न देणारी काकडीची जात (Cucumber Variety) असून ती पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील शेतकर्‍यांमध्ये अधिक उत्पन्न देण्यासाठी विशेष लोकप्रिय आहे. काकडीच्या इतर वाणाच्या तुलनेत या काकडीच्या लागवडीतून चांगले उत्पादन मिळते.

काकडीची पुसा लाँग ग्रीन ही जात हा उन्हाळा (Summer Cucumber Variety) आणि खरीप (Kharif Cucumber Variety) या दोन्ही हंगामांसाठी लागवड करता येणारी जात आहे.

पुसा लाँग ग्रीनची (DC-83) वैशिष्ट्ये

  • उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील छुटमलपूर येथे पुसा लाँग ग्रीन ही जात (Cucumber Variety) निवड प्रक्रियेद्वारे विकसित करण्यात आलेली आहे.
  • या जातीच्या पि‍काला 3-4 शाखा आणि 2.0-2.5 मीटर लांबीच्या वेली असतात.
  • पाने मध्यम हिरवी असतात, या जातीत नर फुले पुंजक्यामध्ये आणि मादी फुले एकाकी येतात.
  • फळे हलक्या हिरव्या रंगाची असतात ज्यात हलके पांढरे-हिरवे पट्टे असतात आणि देठाच्या टोकाजवळ तपकिरी-हिरव्या डाग असतात.
  • फळांची लांबी 15-18 सेमी असते, फळांवर लव नसते, त्वचा मऊ असते.
  • फळांचे सरासरी वजन 150-160 ग्रॅम असते.

पुसा लाँग ग्रीनची उत्पादकता (Pusa Long Green Yield)

2015-16 ते 2017-18 पर्यंत, पुसा लाँग ग्रीनची चाचणी AICRP (भाजीपाला पिके) चाचण्यांचा भाग म्हणून भारतातील अनेक केंद्रांवर करण्यात आली. निकालांवरून असे दिसून आले की पुसा लाँग ग्रीनचे प्रति हेक्टर 18.93 टन उत्पादन मिळते, जे पंत खिरा-1 या जातीपेक्षा 34.93% जास्त आहे. पुसा लाँग ग्रीन फळांची सरासरी लांबी 18.60 सेमी आणि फळांचे सरासरी वजन 161.35 ग्रॅम होते.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.