कोकण, कोल्हपुरात धुवाँधार ..! NDRF ची पथकं रवाना, कोल्हापुरातून कोकणात जाणारी वाहतूक थांबवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. कोकण पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूण शहरातील बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते, रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड रत्नागिरी पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवस खबरदारीचे आहेत. तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही रोखण्यात आली आहे.

कोल्हापुरकडे NDRF टीम रवाना

मागील 24 तासात देखील कोल्हापुरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. NDRF ची टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्यात. कोल्हापूर शहरासाठी एक तर शिरोळ साठी एक टीम रवाना झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सखल भागात पुराचे पाणी साचले आहे. दुपारपर्यंत टीम कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. कोल्हापुरातील कळंबा तलाव देखील ओवरफ्लो झालाय. पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कोल्हापुरातुन कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प

कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा राजमार्ग बंद झालाय. फोंडा, कणकवली कडे जाणारी वाहने एसटी बसेस सुरक्षित ठिकाणी थांबले आहेत. पावसाची संततधार कोल्हापुरात सुरू आहे. तसेच कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील अंबा परिसरात रस्ता खचल्याने वाहतूकही खोळंबलेल्या आहेत. तर पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे.

कोल्हापूर भोगावती, कौलव, राधानगरी, हुन कोकणाकडे जाणारा राज्य मार्ग बंद झाला आहे. हळदी, माळुंगे, परीते, भोगावती या ठिकाणी असणाऱ्या ओढ्यांवर पाणी आले आहे. तरी नदीपात्राजवळ असणाऱ्या रस्त्यावर पाणी आले आहे. हळदी, राशिवडे, राधानगरी कडे जाणारा जिल्हा मार्ग हेडवडे, शिरगाव येथील ओढ्यावर पाणी आल्याने बंद झाला आहे.

चिपळूण

चिपळूण शहरातील वशिष्ठी आणि शिवं नदीला पूर आला त्यामुळे बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाआहे. मुंबई-गोवा आणि चिपळूण-कराड महामार्ग ठप्प झाले आहेत 2005 नंतर प्रथमच एवढे पाणी भरला आहे.

रत्नागिरी चिपळूण कराड महामार्ग

दरम्यान रत्नागिरी चिपळूण कराड मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. खेर्डी बाजारपेठेत देखील पाणी भरलं आहे.