खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे तूर (Tur Variety) हे पीक आपल्या आहारात प्रथिने आणि अनेक आवश्यक घटक पुरवते. जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करणारे हे पीक विविध हवामानातही चांगले उत्पादन देते. योग्य वाणाची निवड केल्यास तूर पिकाचे उत्पादन (Tur Production) निश्चितच वाढते. जाणून घेऊ वेगवेगळ्या रोगांना प्रतिकारक वाण (Disease Resistant Tur Varieties) आणि त्यांचे वैशिष्ट्ये (Tur Variety).
लवकर, मध्यम लवकर परिपक्व होणारे वाण (Early Variety Of Tur)
बीडीएन 716 (Tur Variety): मर आणि वांझ रोगास प्रतिकारक, 100 दाण्यांचे वजन 11 ते 13 ग्रॅम, हेक्टरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल.
गोदावरी: मर आणि वांझ रोगास प्रतिकारक, 100 दाण्यांचे वजन 11 ग्रॅम, हेक्टरी उत्पादन 19 ते 24 क्विंटल.
आयपीएल 15-06: मर आणि वांझ रोगास प्रतिकारक, 100 दाण्यांचे वजन 9.9 ग्रॅम, हेक्टरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल.
फुले तृप्ती: मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक, 100 दाण्यांचे वजन 10.61 ग्रॅम, हेक्टरी उत्पादन 22 ते 23 क्विंटल.
रेणुका: मर आणि वांझ रोगास प्रतिकारक, 100 दाण्यांचे वजन 11.70 ग्रॅम, हेक्टरी उत्पादन 19 ते 22 क्विंटल.
मध्यम उशिरा आणि उशिरा परिपक्व होणारे वाण (Late Variety Of Tur)
पीकेव्ही तारा: मर रोगास प्रतिबंधक, वांझ रोगास प्रतिकारक, 100 दाण्यांचे वजन 9.6 ग्रॅम, हेक्टरी उत्पादन 19 ते 20 क्विंटल.
विपुला: मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक, 100 दाण्यांचे वजन 9 ते 10 ग्रॅम, हेक्टरी उत्पादन 16 क्विंटल.
बीएसएमआर 736: मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक, 100 दाण्यांचे वजन 10 ते 11 ग्रॅम, हेक्टरी उत्पादन 15 ते 16 क्विंटल.
बीएसएमआर 853: मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक, 100 दाण्यांचे वजन 11 ते 12 ग्रॅम, हेक्टरी उत्पादन 15 ते 16 क्विंटल.
आशा (आयसीपीएल 87119): मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक, 100 दाण्यांचे वजन 10 ते 11 ग्रॅम, हेक्टरी उत्पादन 12 ते 14 क्विंटल.
पीडीकेव्ही आश्लेषा: मर, वांझ, फायटोफथोरा करपा तसेच पानांवरील सर्कोस्पोरा ठिपके यांना मध्यम प्रतिकारक (Tur Variety), 100 दाण्यांचे वजन 10.75 ग्रॅम, हेक्टरी उत्पादन 19 ते 20 क्विंटल.