Eicher 312 Tractor : शेतकऱ्यांसाठी आयशरचा 30 एचपीचा पॉवरफुल ट्रॅक्टर; वाचा.. किंमत?

Eicher 312 Tractor For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय ट्रॅक्टर निर्माता कंपन्यांमध्ये आयशर ही कंपनी (Eicher 312 Tractor) शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा आयशर कंपनीवर विश्वास आहे. आयशर कंपनीने शेतकऱ्यांसाठी विविध रेंजचे ट्रॅक्टर तयार केलेले असून, गरजेनुसार ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा दमदार ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर आयशर कंपनीचा ‘आयशर 312’ हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. आज आपण आयशर कंपनीच्या ‘आयशर 312’ या ट्रॅक्टरबद्दल (Eicher 312 Tractor) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘आयशर 312’ ट्रॅक्टरबद्दल (Eicher 312 Tractor For Farmers)

आयशर कंपनीचा ‘आयशर 312’ हा ट्रॅक्टर (Eicher 312 Tractor) 1963 सीसी क्षमतेसह उपलब्ध असून, त्याला कंपनीने 2 सिलेंडर दिले आहेत. याशिवाय कंपनीकडून या ट्रॅक्टरला वॉटर कुलिंग सिस्टिम देण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर 30 एचपी पावर जनरेट करतो. कंपनीने या ट्रॅक्टरला ऑइल बाथ टाईप एयर फिल्टर दिलेला आहे. या ट्रॅक्टरला प्रामुख्याने 25.5 एचपी इतकी पीटीओ पावर देण्यात आली आहे. तर या ट्रॅक्टरचे इंजिन 2150 आरपीएमची निर्मिती करते. या ट्रॅक्टरला कंपनीने 27.93 किमी प्रति तास इतका वेग दिलेला आहे. आयशर कंपनीचा हा ट्रॅक्टर 1600 ग्रॅम वजन उचलू शकतो. त्याला कंपनीने एकूण 1710 किलोग्रॅम वजनामध्ये तयार केले आहे. आयशर कंपनीच्या ‘आयशर 312’ या ट्रॅक्टरला कंपनीने 45 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे.

‘आयशर 312’ ट्रॅक्टरचे फीचर्स

आयशर 312 या ट्रॅक्टरला (Eicher 312 Tractor) मेकॅनिकल स्टीयरिंग देण्यात आली आहे. तसेच या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला सिंगल क्लच आणि सेंट्रल शिफ्ट, पार्शियल कॉन्स्टंट मेश टाइप ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ड्राय डिस्क ब्रेक दिलेला आहे. ज्यामुळे शेतीमध्ये ट्रॅक्टरवर तात्काळ नियंत्रण मिळवता येते. आयशर कंपनीचा हा ट्रॅक्टर लाईव्ह पॉवर टेकऑफसह उपलब्ध आहे. जो 1000 आरपीएम, 1616 ईआरपीएमची निर्मिती करतो. आयशर 312 हा ट्रॅक्टर टू व्हील ड्राइवसह उपलब्ध आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 6.00 x 16 आकारात तर मागील बाजूस 12.4 x 28 आकारात टायर दिलेले आहे.

किती आहे किंमत?

आयशर कंपनीच्या ‘आयशर 312’ या ट्रॅक्टरची शोरूम किंमत कंपनीने 4.80 लाख ते 5.10 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन शुल्क आणि रोड टॅक्स वेगवेगळा असल्याने, वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ट्रॅक्टरची ऑन रोड प्राइस वेगवेगळी राहू शकते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 2 वर्षांची वॉरंटी प्रदान केलेली आहे.