हॅलो कृषी ऑनलाईन : देशात विविध नावाजलेल्या ट्रॅक्टर कंपन्यांमध्ये आयशर ट्रॅक्टर (Eicher Tractors) कंपनी ओळखली जाते. विशेष म्हणजे आयशर कंपनीचे ट्रॅक्टर हे शेतकर्यांमध्ये खूपच लोकप्रिय असून, कंपनीने 18 ते 60 एचपीच्या रेंजमध्ये पंधरापेक्षा जास्त ट्रॅक्टरच्या श्रेणीमध्ये निर्मिती केली आहे. यातच आयशर 330 (Eicher Tractors) या 30 एचपीच्या ट्रॅक्टरची लॉन्च झाल्यापासून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता मिळवत आहे.
कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी (Eicher Tractors For Farmers)
‘आयशर 330’ हा ट्रॅक्टर कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे. या ट्रॅक्टरच्या मदतीने शेती संबंधित ट्रॅक्टरचलीत अनेक उपकरणे चालवता येतात. आयशर 330 ट्रॅक्टरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत देखील शेतकऱ्यांच्या अगदी बजेटमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण आयशर 330 या ट्रॅक्टरबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
‘आयशर 330’ ट्रॅक्टर’ची वैशिष्ट्ये :
‘आयशर 330’ ट्रॅक्टर’ला तीन सिलेंडर, तीस हॉर्स पॉवर शक्ती आणि 2272 सीसी पॉवरफुल इंजिनसह उपलब्ध आहे. या ट्रॅक्टरमध्ये इनलाइन इंधन पंप देण्यात आला आहे. सिम्पसन कंपनीने हे इंजिन दिले आहे. कुलींगसाठी वॉटर कुलिंग सिस्टिम देण्यात आली आहे. यासोबतच हे ट्रॅक्टर कॉस्टंट मॅश आणि स्लाइडिंग मॅशच्या संयोजनासह सेंटर शिफ्ट प्रकार ट्रान्समिशन सोबत जोडलेला आहे. या ट्रॅक्टरला पुढील बाजूस आठ आणि मागील बाजूस दोन रिव्हर्स गिअर देण्यात आले आहेत. या ट्रॅक्टरला कंपनीने 29.83 किमी प्रति तास वेग दिला आहे. याशिवाय कंपनीने या ट्रकरला बारा वॅट आणि 75एएचची बॅटरी दिलेली आहे.
किती आहे किंमत?
आयशर 330 हा ट्रॅक्टर ऑइल इमरस्ड ब्रेकसह येतो. याशिवाय कंपनीने या ट्रॅक्टरला मेकॅनिकल पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे. याशिवाय कंपनीने आयशर 330 ट्रॅक्टरमध्ये लाइव्ह पिटीओ दिलेला असून, तो 1000 आरपीएमची निर्मिती करतो. या ट्रॅक्टरमध्ये तीन पॉईंट लिंकेजसह एडीडीसी प्रकारातील हायड्रॉलिक्स देण्यात आले आहेत. या हायड्रोलिकची उचलण्याची क्षमता बाराशे किलो आहे. तीस एचपी श्रेणीतील ट्रॅक्टरमध्ये उचलण्याची क्षमता खूप चांगली मानली जाते. इतकेच नाही तर आयशर 330 ट्रॅक्टरची किंमत कंपनीने 4 लाख 84 हजार 330 रुपये इतकी निर्धारित केली आहे. ही ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत आहे.