जयहिंद शुगरच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार ; 3 तास कारखाना पाडला बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात अद्यापही उसाच्या थकीत बिलाचा प्रश्न जैसे थे आहे. यंदाच्या वर्षीचे सोडाच पण मागील २ वर्षीचे बिल देखील अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जय हिंद शुगर प्रा.लिमटेड या साखर कारखान्याने सन २०१९ -२० या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत रक्कम न दिल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जय हिंद शुगरचे वजन काटा बंद करत क्रेन बंद करून तीव्र आंदोलन केले. गेल्या दोन वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला लाखो टन ऊस जय हिंद कारखान्याला गळपासाठी पाठवला होता.

दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्याने शासनाच्या नियमानुसार जमाव बंदीचा आदेश होता त्यामुळे हे पीडित शेतकरी एकत्रित येऊन आंदोलन करू शकत नव्हते. पण या काळात शेतकरी स्वतः कारखाना प्रशासनाला थकीत रक्कमेची मागणी करत होते.कारखाना वेगवेगळे करणे सांगून वेळ मारून नेत असत. थकीत रक्कमे बद्दल विचारले असता आज करू उद्या करू असे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची तोंडे पुसले जात होते. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जय हिंद शुगर आचेगाव येथे एकत्रित येऊन कारखान्याच्या विरोधात एल्गार पुकारत ऊस वजन काटा आणि क्रेन बंद पाडत जवळपास ३ तास साखर कारखाना बंद पाडला.