शेतकरी मित्रांनो वेळेत भरा शेतसारा ; अन्यथा सातबाऱ्यावर येईल ‘महाराष्ट्र शासनाचे नाव’

Farm
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या विविध शाखेत मार्च एन्डच्या कामांनी वेग धरला आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील अद्याप शेतसारा भरला नसेल तर ताबडतोब शेतसारा भरण्याच्या तयारीला लागा. नाहीतर शासनाकडून कारवाई होऊ शकते एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नावही लागू शकते.

शेतकरी मित्रानो अनेक शेतकऱयांनी अद्याप शेतकसाऱ्याची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत शेतसाऱ्याची रक्कम भरली जावी या उद्देशाने निफाड येथील तहसीलदारांनी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महसूल विभागाचे कर्मचारी गावोगावी फिरत आहेत. तसेच ३१ मार्च पर्यंत शेतसारा भरण्याचे आवाहन करीत आहेत . शेतकऱ्यांनी शेतसारा वेळेत भरावा आणि त्यांच्यावर कारवाई होऊ नये याकरिता निफाड तालुक्यात वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे.

कसा आहे नियम ?

–शेतकऱ्यांनी वेळेत रक्कम अदा केली नाही तर नोटीस बजावली जाते.
–यानंतरही कर अदा केला नाही तर सक्तीच्या वसुलीच्या कारवाईला सुरवात केली जाते.
— या कारवाईला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 176 ते 182 अन्वये कायदेशीर असा आधार आहे.
–पहिल्या नोटीसनंतर दुसरी नोटीस ही जंगम मालमत्ता आणि त्यानंतर स्थावर मालमत्ता.
–एवढे करुनही जर खातेदाराने कर अदा केला नाही तर मात्र, स्थावर मालमत्ता जप्त होते म्हणजेच खातेदाराच्या उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव लागते.
–यानंतरही शेतकऱ्यांनी कर अदा केला नाही तर मात्र सदर मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जात असल्याची माहिती तहसीलदारांकडून देण्यात आली आहे.