हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य शासनाकडून खरीप हंगामात पीक विमा भरण्याकरिता मुदत वाढवण्यात आली होती. मात्र रब्बी हंगामात पंतप्रधान विमा योजनेच्या मुदतीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही . त्यामुळे शेतकरी मित्रानो प्रधानमंत्री विमा योज़नेत सहभागी होऊ इच्छित असाल तर केवळ ३१ डिसेम्बर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर पूर्वी जर शेतकऱ्यांनी विमा भरला नाही तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यांना कुठलीही भरपाई मिळणार नाही.
विम्याचा हफ्ता हा किती असेल ?
गहू, मसूर, मोहरी, बार्ली या प्रमुख रब्बी पिकांसाठी दीड टक्के तसेच बटाट्यासाठी पाच टक्के प्रीमियर दर ठरवण्यात आला आहे.
लाभ कसा घेता येईल ?
अनुदान, योजना या नैसर्गिक आपत्ती तसेच इतर प्रकारच्या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते. झालेल्या पिकाचे नुकसान भरून निघावेत यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारत सरकारच्या पोर्टल वर जाणून नोंदणी करणे गरजेचे आहे.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी काय काम करावेत ?
शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्यास कृषी विभाग, संस्था , संबंधित बँक शाखा यास ७२ तासांच्या आत सर्व परिस्थितीचा तपशील द्यावा लागतो. विमा केवळ दीड टक्के प्रीमियर वर असेल. उरलेली रकम ही केंद्र , राज्य सरकार मिळून भरतात .
संपर्क
मदतीसाठी १८००-८८९-६८६८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.