Farmer Success Story : काकडीच्या शेतीने बदलले तरुणाचे नशीब; केली 4 लाख रुपयांची कमाई; जाणून घ्या कस केलं नियोजन?

Farmer Success Story
Farmer Success Story
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Farmer Success Story : शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी नवनवीन तंत्रांचा अवलंब करत आहेत. भाजीपाला आणि औषधी वनस्पतींची लागवड करून शेतकरी आपली आर्थिक स्थिती सुधारत आहेत. नवनवीन प्रयोग शेतीत करून शेतकरी चांगले उत्पादन घेऊन नफा कमवत आहेत. महाराष्ट्रासोबत बिहारमधील तरुण शेतकरी देखील भाजीपाला आणि औषधी वनस्पतींची लागवड करून चांगली कमाई करत आहेत. त्यासाठी बिहार सरकार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देखील देत ​​आहे.

काकडीची लागवड

बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील सुबोध झा या तरुण शेतकऱ्याने आपल्या 4 एकर जमिनीत नेट हाऊस पद्धतीने काकडीची लागवड सुरू केली आणि त्यासाठी त्यांनी बिहार सरकारकडून अनुदानही घेतले. अवघ्या तीन ते चार महिन्यांत चार ते पाच लाख रुपयांचा नफा मिळाल्याचे शेतकरी सुबोध सांगतात. या कमाईतून त्यांनी आता औषधी वनस्पतींची लागवडही सुरू केली आहे.

मित्राने दिला सल्ला

याबाबत बोलताना शेतकरी सुबोध सांगतात की, ते अनेक वर्षांपासून शेती करतायेत, पण बिहारच्या कृषी विभागात काम करणाऱ्या त्याच्या एका मित्राने काकडीच्या शेतीबद्दल सांगितलं. त्यांच्या सल्ल्याने त्यांनी शेती सुरू केली. सुबोध त्याच्या काकडीच्या लागवडीसाठी फक्त सेंद्रिय खतांचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्या काकड्यांना बाजारात मोठी मागणी आहे.

काकडीचा बाजारभाव कुठे चेक करणार?

तुम्हाला जर काकडीचे दररोजचे ताजे बाजार भाव पाहायचे असतील तर लगेचच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही काकडीला तुमच्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती बाजार भाव मिळतोय याबाबतची माहिती अगदी मोफत घेऊ शकता. फक्त काकडीच नाहीतर तुम्ही इतर शेतमालाचे देखील बाजार भाव या ॲपच्या माध्यमातून पाहू शकतात. त्यामुळे लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

त्याचबरोबर या शेतकऱ्याने सांगितले की, त्याच्या काकडीच्या लागवडीचे यश पाहून आजूबाजूचे सहकारी शेतकरीही प्रभावित झाले आहेत आणि त्यांनीही काकडी आणि औषधी वनस्पतींची लागवड सुरू केली आहे. शेतकरी सुबोध हे वेळोवेळी आपल्या जिल्ह्यातील कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला घेत कृषीविषयक माहिती घेतात. नेट हाऊसमध्ये भाजीपाल्याची लागवड केल्याने त्यांचे उत्पादनही चांगले आल्याचे ते सांगतात आणि इतर तरुण शेतकरीही त्यांच्या मार्गावर जाऊ लागले आहेत असं ते म्हणाले आहेत.