Farmers Success Story: हा प्रयोगशील शेतकरी करतोय, कॅन्सर आजारावर फायदेशीर ‘थायोमल्ली जस्मीन’ राइसची शेती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतातील शेतकरी (Farmers Success Story) आता विविध परदेशी भाजीपाल्या (Exotic Vegetables) सोबतच परदेशी जातीच्या धान्याची सुद्धा लागवड करायला लागले आहेत. काही परदेशी धान्यात (Exotic Food Grains) औषधी आणि आरोग्यासाठी हितकारक गुणधर्म असल्यामुळे त्यांची मागणी भारतात वाढताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा या धान्याच्या लागवडीकडे वळत आहेत (Farmers Success Story).

असेच एक प्रगतशील शेतकरी आहेत (Farmers Success Story) नवीन पनवेल गुळसुंदे येथील, कृषिभूषण मिनेश गाडगीळ. मिनेश (Krushi Bhushan Shetkari) यांनी त्यांच्या शेतामध्ये पर्पल राइस (Purple Rice) म्हणजेच इंडोनेशियातील (Indonesia) ‘थायोमल्ली जस्मीन राइसची’ (Thooyamalli Jasmine Rice) लागवड केली आहे. हा तांदूळ विशेषतः लहान मुलांसाठी उपयुक्त आहे.

मिनेश यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग (Agriculture Crop Experiment) करून आतापर्यंत अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने घेतलेली आहेत. ज्यामध्ये ड्रॅगनफ्रूट, स्ट्रॉबेरी, लाल तांदूळ, काळा तांदूळ, बासमती, आंबेमोहोर, डायबेटिससाठीचा आरएनआर तांदूळ, कलर कलिंगड व मस्कमेलन इत्यादींचा त्यात समावेश आहे (Farmers Success Story).

आपल्याकडे यशस्वी झालेले उत्पादन इतरही परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावे, यासाठी त्यांचा सतत प्रयत्न चालू असतो. जेणेकरून पारंपरिक पिकांबरोबर नाविन्यपूर्ण उत्पादने घेतल्यास शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असा त्यांचा विश्वास आहे (Farmers Success Story)

रायगड जिल्ह्यात मुख्यत्वे करून भात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. साधारण जया, रत्ना, कोलम अशा प्रकारचे भात उत्पादन होते व त्यापासून तांदूळ काढला जातो. विशेष करून आपल्या परिसरातील आहाराचा विचार करणे म्हणजे भात, भाकरी, पोहे, घावण इत्यादींच्या गरजेनुसार हा तांदूळ पिकवला जात होता.

यामध्ये विक्री करून व्यापारिक दृष्टिकोन नसल्याने वरील भाताच्या जाती परिसरात काढल्या जात होत्या. जेणेकरून आपल्या कुटुंबाची गरज भागवली जाईल, परंतु औद्योगिकरणामुळे निर्माण झालेली आजूबाजूची विकसित शहरे व मागणी यांचा विचार केल्यास नाविन्यपूर्ण कृषिमाल तयार करणे ही काळाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. 

बियाणे तयार करणार
हा तांदूळ कोकणात पहिल्यांदाच घेतला गेला असून  (Farmers Success Story) पीक तयार झाल्यानंतर या तांदळाच्या जातीचे बियाणे तयार करून ते आजूबाजूच्या परिसरातील शेतकर्‍यांना आपण उपलब्ध करून देऊ असा आशावाद मिनेश गाडगीळ यांनी व्यक्त केला.

नैसर्गिक पिग्मेंटमुळे येणार्‍या जांभळ्या रंगाला ग्राहकांची पसंती
साधारण 30 ते 40 क्विंटल एकरी उत्पादन देणार्‍या या जाती असून अनेक गुणधर्म या तांदळात आढळून येतात. ज्यामध्ये कमी ग्लॅयसेमिक इन्डेक्स, अॅन्टी ऑक्सिडन्ट इफेक्ट, अॅन्टी कॅन्सर इफेक्ट, विशेष प्रकारचा सुवास, शिजण्यासाठी कमी कालावधी इत्यादी व नैसर्गिक पिग्मेंटमुळे येणार्‍या विविध रंगामुळे ग्राहकांची यास विशेष पसंती असल्याचे निदर्शनास (Farmers Success Story) आले आहे. तसेच आरोग्यासाठी हितकारक असल्याने मागणीही आहे.