Farmers Success Story: ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर या शेतकऱ्याने तयार केला ‘जांभळाचा’ ब्रँड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पारंपारिक शेतीला (Farmers Success Story) फाटा देऊन दौंड तालुक्यातील दिनेश भुजबळ (Dinesh Bhujbal) हा शेतकरी शेतात जांभळाची लागवड (Jamun Farming) करून लाखोंचे उत्पादन घेत आहेत. कोरोना काळापासून थेट ग्राहकांशी जोडून त्यांना रसरशीत आणि ताजी जांभळे घरपोच देऊन या शेतकऱ्याने फक्त ग्राहकांची विश्वासाहर्ता   कमावली असे नाही तर मेहनतीने आपल्या जांभळाचा ब्रँड (Jamun Fruit Brand) सुद्धा तयार केला आहे (Farmers Success Story). 

पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड तालुका हा उसासाठी आणि फळपिकांसाठी ओळखला जातो. येथील राहू परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड केली जाते. येथीलच पिल्लनवाडी गावचे शेतकरी दिनेश भुजबळ त्यांच्या शेतात बऱ्याच वर्षांपासून डाळिंबाची लागवड करत होते. पण 2014 साली त्यांनी डाळिंब बाग काढून जांभूळ लागवड करण्याचा निर्णय घेतला (Farmers Success Story). सव्वादोन एकरामध्ये त्यांनी 225 झाडे लावली असून ही बाग आता 10 वर्षांची झाली आहे. 

जांभूळ लागवड केल्यापासून 5 व्या वर्षी फळे लागायला सुरूवात झाली आणि तेव्हापासून त्यांनी थेट ग्राहकांना विक्री करायला सुरूवात केली. कोरोना काळामध्ये त्यांना विक्री करण्यास खूप अडचणी आल्या. म्हणून त्यांनी आपला माल थेट ग्राहकांना विक्री (Direct To Customer Sale) करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी घेतलेला निर्णय फायद्याचा ठरला आणि अजूनही भुजबळ हे आपल्या शेतातील जांभळे त्याच ग्राहकांना घरपोच देतात. त्यामुळे भुजबळ यांच्या शेतातील जांभुळांवर ग्राहकांचा विश्वास बसलाय (Farmers Success Story).

सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री  (Farmers Success Story)
भुजबळ यांच्या बागेला 2019-20 साली फळधारणा झाली पण 2020 साली लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना थेट विक्रीसाठी अडचणी आल्या. यावर मात करत त्यांनी फेसबुकसारख्या सोशल मिडीयाचा वापर करत थेट ऑनलाईन पद्धतीने ग्राहक मिळवले आणि विक्री सुरू केली. आज ते उत्पादित झालेल्या मालातील 80 टक्के माल थेट ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने विक्री करतात.

ताज्या जांभळांची विक्री
जांभूळ (Jamun Fruit) झाडावरून तोडले की दोन तासांमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सोय ते करतात. त्यामुळे ग्राहकांना ताजे फळ खायला मिळते. ताज्या फळाला ग्राहक किंमत मोजायला मागेपुढे पाहात नाहीत असा त्यांचा अनुभव आहे (Farmers Success Story).

जांभळाची प्रतवारी

झाडावरून जांभळांची तोडणी केल्यानंतर प्रतवारी केली जाते. जांभळाच्या आकारानुसार त्याची पॅकिंग केली जाते. मोठ्या आकाराच्या जांभळाचीच ग्राहकांना विक्री केली जाते. प्रतवारी करताना जांभळावर डाग आणि साल निघाली नसल्याची खात्री केली जाते. एक किलो, दोन किलो आणि मागणीप्रमाणे पॅकिंग केले जाते. 

गणेश गार्डन – भुजबळ फार्म ब्रँड (Ganesh Garden- Bhujbal Farm)
भुजबळ यांच्याकडील जांभळे खात्रीचे आणि चवीला उत्तम असल्यामुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. यातच भुजबळ यांनी ब्रँडची जोड दिली आणि गणेश गार्डन – भुजबळ फार्म या नावाने बॉक्स पॅकिंग करायला सुरूवात केली. यामुळे ग्राहकांना जांभळाची क्वालिटी चांगली मिळायला लागली आणि भुजबळ फार्मच्या जांभळाची जाहिरात होण्यासही मदत झाली (Farmers Success Story) आज ते पूर्व पुणे भागांत आपल्या जांभळांची विक्री करतात.

उत्पन्न
भुजबळ यांनी लागवड केलेल्या 225 झाडांतील साधारण 100 झाडांना दरवर्षी माल लागतो. बाकीच्या झाडांना पुढील वर्षी माल लागतो. त्यामुळे झाडांच्या मालाची सरासरी कमी निघते. एका झाडाला एका वर्षाला साधारण 50 किलोपर्यंत माल निघतो असे ते सांगतात. यातून 12 ते 13 लाख रुपयांची उलाढाल होते (Farmers Success Story) सध्या जांभूळ या फळाला चांगला बाजारभाव मिळत आहे. शहरातील जनता मोठ्या आवडीने हे फळ खातात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना जांभूळ लागवड करून चांगला नफा कमवायचा आहे.  त्यांच्यासाठी दिनेश भुजबळ यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे.