हॅलो कृषी ऑनलाईन: कोणताही व्यवसाय (Farmers Success Story) लहान नसतो. फक्त गरज आहे त्यात संधी शोधण्याची. अशीच एक संधी शोधली आहे गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) देसाईगंज तालुक्यातील सांगवी येथील महेश मोतीराम दिवटे (Mahesh Divate) या शेतकऱ्याने (Farmers Success Story).
महेश दिवटे हा शेतकरी एक रुपयाला एका भाजीपाला रोपट्याची विक्री करून लाखो रुपये कमावत आहे. स्वत:च्या शेतात ग्रीन नेट शेड उभारून स्वत:सह कुटुंबालाही बारमाही रोजगार (Farmers Success Story) उपलब्ध करून दिलेला आहे.
भाजीपाला रोपवाटिकेची कल्पना कशी सुचली?
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड (Vegetable Production) करतात. लागवड करण्यापूर्वी रोपे (Seedlings) तयार करावी लागतात. कडक ऊन, जोराचा पाऊस यामुळे कोवळी रोपे उघड्या वातावरणात तग धरत नाही. काही कालावधीतच मरण पावतात. शेतकर्यांना खरेदी करावे म्हटले तरी शोध घेऊनही रोपे मिळत नाही. परिणामी शेतकर्याला शेत पडीक ठेवावे लागते. ही बाब महेश यांच्या लक्षात आली. यातून भाजीपाला रोपवाटिका तयार करण्याची संकल्पना सुचली. रोपवाटिका कशी तयार करावी, याची माहिती महेश याने यु-ट्यबवर (YouTube) मिळवली.
पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर स्वत:च्या घराच्या स्लॅबवर रोपवाटिका (Vegetable Nursery) तयार केली. पहिल्याच वर्षी सर्व रोपे शेतकर्यांनी खरेदी केली. यातून त्यांना नफाही मिळाला (Farmers Success Story). यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. दुसर्या वर्षी त्यांनी स्वत:च्या शेतात रोपे लागवडीचा प्रोजेक्ट उभारला. यावर्षी चौथे वर्ष असून सुमारे पाच लाख रोपांची टप्प्याटप्प्याने लागवड करण्याचे नियोजन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारची पहिलीच रोपवाटिका असावी. त्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कशी आहे भाजीपाला रोपवाटिका?
महेश यांनी स्वत:च्या शेतात एक हजार चौरस मीटर क्षेत्रावर रोपवाटिका तयार केली आहे. लोखंडी खांब उभारून त्यावर ग्रीन नेट टाकली आहे. बाजूचे किडे येऊ नये यासाठी बाजूलाही इन्सेक्ट नेट बसवले आहे. वरच्या ग्रीन नेटमुळे पाऊस किंवा ऊन थेट रोपांवर पडत नाही. यामुळे त्यांचे संरक्षण होते. प्लास्टिक ट्रेमध्ये नारळाचा भुसा व गांडुळ टाकून त्यात बिया रोवल्या जातात. यातून निरोगी रोपे तयार होतात. प्रति रोप जवळपास एक रुपया ते दीड रुपया दराने विक्री करतात. शेतकऱ्याने स्वत:चे बियाणे आणून दिले तर जवळपास 80 पैसे प्रति रोप आकारले जाते.
मिरची, वांगे, टमाटर, कारले, झेंडू, कोबी किंवा इतर भाजीपाल्याची रोपे ऑर्डरप्रमाणे तयार केली जातात. रोपे रोगमुक्त राहत असल्याने ही रोपे खरेदी करण्याकडे शेतकर्यांचा कल वाढत आहे (Farmers Success Story). अशी माहिती शेतकरी महेश दिवटे यांनी दिली.