Fieldking Rotary : फिल्डकिंगचा रोटर शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान; डिझेलची बचत होणार!

Fieldking Rotary For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतीच्या मशागतीची कामे जोरात सुरु असून, अनेक शेतकऱ्यांना अवजारे खरेदीची (Fieldking Rotary) गरज भासत आहे. सध्या ट्रॅक्टरचा उपयोग अधिक प्रमाणात वाढला आहे. साहजिकच ट्रॅक्टरचलित साधनांची गरज देखील तितक्याच क्षमतेने वाढली आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये रोटर या यंत्राची गरज भासत आहे. त्यामुळे आता तुम्हीही एखादा दणगट रोटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण ‘फिल्डकिंग रोटर’ (Fieldking Rotary) या मजबूत आणि टिकाऊ रोटरबद्दल अधिक जाणून माहिती घेणार आहोत.

शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान (Fieldking Rotary For Farmers)

सध्याच्या घडीला मार्केटमध्ये अनेक रोटर विकणाऱ्या कंपन्या आहेत. मात्र फिल्डकिंगचा रोटर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या रोटरच्या वैशिट्येमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. या रोटरमुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी कमी इंधन लागते. जो शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा घटक असतो. याशिवाय खात्रीशीर पार्ट वापरण्यात आल्यामुळे हा रोटर वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करतो.

काय आहेत वैशिष्ट्ये?

  • मिनी मल्टी स्पीड रोटर लहान शेतात, फळे आणि भाज्या, फळबागा, बागकाम आणि रोपवाटिकांसाठी वापरला जातो.
  • हा रोटर प्रामुख्याने मातीचे कंडिशनिंग आणि तण नियंत्रण, बियाणे तयार करणे आणि लहान शेतात पुडलिंगसाठी योग्य ठरतो.
  • मल्टी स्पीड गियर बॉक्समुळे ट्रॅक्टरच्या विस्तृत श्रेणीसह याचा वापर केला जाऊ शकतो.
  • हा रोटर 4 ते 5 इंच खोल माती सैल आणि हवाबंद करू शकते.
  • ब्लेडच्या हेलिकल व्यवस्थेमुळे ट्रॅक्टरवरील भार कमी होतो. ज्यामुळे मशागत जलद आणि किफायतशीर होते.
  • या रोटरला ओव्हरलोड संरक्षणासाठी शिअर बोल्ट/स्लिप क्लचसह हेवी ड्यूटी पीटीओ शाफ्ट (पर्यायी) उपलब्ध आहे.
  • हा रोटर सीलबंद बियरिंग्ज ओलावा/चिखल प्रवेशास प्रतिबंध करतो.
  • हा रोटर मजबूत फळी उत्तम प्रकारे समतल आणि तयार बीजकोश सुनिश्चित करतो.

3 ते 10 फूट श्रेणीमध्ये उपलब्ध

फिल्डकिंगचे रोटर (Fieldking Rotary) प्रामुख्याने 3 ते 10 फूट श्रेणीमध्ये उपलब्ध आहे. फिल्डकिंगचा रोटरचे काम 106 देशात चालते. फिल्डकिंग रोटरसोबत सध्या 1.5 दशलक्ष शेतकरी आणि 1500 डीलर्स जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना रोटर खरेदीसाठी फिल्डकिंगकडून विविध बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना रोटर खरेदीसाठी आर्थिक मदत होते.