Fish Farming Business: खोल समुद्रातील मासेमारीला उत्तम पर्याय, ‘मत्स्यशेती’!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: समुद्र किनारी राहणार्‍या लोकांचा मुख्य व्यवसाय (Fish Farming Business) म्हणजे समुद्रातील मासेमारी (Sea Fishing) हा आहे. परंतु हवामान बदल, एलईडी मासेमारी, तसेच जेलीफिशचे अतिक्रमण त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी संकटात सापडली आहे. त्यामुळे भविष्यात मासेमारीला पर्यायाचा विचार केल्यास मत्स्यशेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी ‘पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेची’ (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) मोठी मदत होऊ शकते.

या योजनेंतर्गत रायगडमध्ये (Raigad) आतापर्यंत 1771 एकरवर मत्स्यशेती केली जात असून, रायगडमध्ये यासाठी पोषक वातावरण, जागा असल्याने खोल समुद्रातील मासेमारीला पर्यायी व्यवस्था म्हणून मत्स्यशेती (Fish Farming Business) हा पर्याय उभा राहू शकतो 2015 पासून रायगडमध्ये मत्स्यशेतीची बीजे रोवली गेली.

यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत मत्स्य व्यवसाय करणाऱ्या 1832 सहकारी संस्था रायगडमध्ये उभ्या राहिल्या असून, त्या 1771 एकरवर मत्स्यपालन करत आहेत. त्यातून दोन कोटींपर्यंतची उलाढाल होत आहे.

भात शेतीनंतर सागरी मत्स्य व्यवसाय हा रायगडकरांचा मुख्य व्यवसाय आहे. रायगडमध्ये मत्स्य व्यवसाय करणाऱ्या 35 हजार 896 सहकारी संस्था असून, 2 हजार 998 मासेमारी बोटींच्या सहाय्याने मासेमारी केली जात आहे. यातून 60 ते 70 हजार मे. टन मासे पकडून त्यांची विक्री केली जात होती. मात्र, दिवसेंदिवस यात मोठी घट होत आहे.

मत्स्य शेतीबाबत आढावा (Fish Farming Business)
एकूण क्षेत्र – 1771

भूजल मत्स्य उत्पादन (मे. टन) – 1358.01

पकडलेल्या माशांची किंमत (लाख रू.) – 205.64
वापरलेले मत्स्यबीज (लाख रू.) – 88.55

मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था – 1832

मत्स्य उत्पादन घटतेय
• 2018-19 मध्ये खोल समुद्रातील मासेमारीतून 58,847 मे. टन मासे विक्री करण्यात आली होती. हे प्रमाण झपाट्याने कमी होत 2020-21 पर्यंत 38,019 मे. टनावर आली आहे. त्यामुळे याला मत्स्यशेती (Fish Farming Business) हा एक चांगला पर्याय आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.