Fruit Orchard Management: सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष, डाळिंब आणि आंबा फळबागेचे असे करा नियोजन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. फळबागा (Fruit Orchard Management) वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. द्राक्ष बाग काडी परिपक्वतेच्या अवस्थेत असून पावसामुळे डाळिंबावर तेल्या व आंब्यावर फांदेमर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यावेळी कसे नियोजन करावे याबद्दल तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलेले आहे. जाणून घेऊ या सविस्तर.

द्राक्ष (Grapevine Management)

द्राक्ष (Grape) बागा काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात असतील. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरड छाटणी झालेल्या बागेत यावेळी काडी परिपक्व होऊन वेलीचा या शेवटच्या टप्प्यातील विश्रांतीचा कालावधी मानला जातो. या बागेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात फळछाटणी होणे अपेक्षित आहे. यासाठी काडी परिपक्वता पूर्ण झालेली असावी. काडी पक्वतेनुसार  पुढील उपाययोजना महत्त्वाच्या आहेत (Fruit Orchard Management).

  • बागेत पाणी पूर्णपणे बंद करावे.
  • पालाशयुक्त खताचा वापर ठिबकद्वारे @ 1 ते 1.25 किलो / एकर / दिवस याप्रमाणे आणि फवारणीद्वारे 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करावे.
  • ठिबकद्वारे पंधरा ते वीस मिनिटामध्ये खते द्यावीत.ड्रीपर कमीत कमी वेळ चालू  राहील, असे पाहावे.
  • शेंडा पिंचींग करून घ्यावे, बगलफुटी निघालेल्या असल्यास त्या त्वरित काढून घ्याव्यात.
  • फुटी काडीवर मोकळ्या राहतील, असे नियोजन करावे. असे केल्यास काडीवर पुरेसा सूयाप्रकाश पडून त्यात लीग्नीन तयार होण्यास मदत होईल.

डाळिंब (Pomegranate Management)

सध्या रोगट फळांवर सतत पडणाऱ्या पावसाच्या थेंबाद्वारे तेल्या रोगाचा (Pomegranate Bacterial Blight Disease) प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे (Fruit Orchard Management). तेल्या रोगाचा (Telya Rog) प्रसार नियंत्रणासाठी  स्ट्रेप्टोसायक्लीन 5 ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सीक्लोराईड 20 ग्रॅम प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून जमिनीत बुंध्याजवळ आळवणी व फवारणी सलग तीन दिवस करावी.

आंबा (Mango Orchard Management)

ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे दाट पालवी असलेल्या आंब्याच्या झाडावर फांदेमर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. झाडावर फांदेमर रोगाचा (Mango Disease) प्रसार झाल्यास प्रादुर्भावग्रस्त ठिकाणची साल उभी तडकल्यासारखी दिसते. त्यामध्ये पांढरट बुरशीची वाढ झालेली दिसते. फांदी शेंड्याकडून वाळत जाते. नवीन लागवड केलेल्या बागांमध्ये (Fruit Orchard Management) प्रादुर्भाव मुख्य खोडावर दिसून येतो. नियंत्रणासाठी, फांद्या प्रादुर्भावग्रस्त भागाच्या दोन ते तीन इंच खाली कापून नष्ट कराव्यात. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. पावसाची उघडीप असताना 1 टक्का बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात घेऊन खोड व फांद्या व्यवस्थित भिजतील अशा प्रकारे फवारणी करावी. झाडाच्या बुंध्यात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.