हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात किडी आणि रोगाप्रमाणेच तणांचा (Gajar Gavat Control) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. विशेषतः गाजर गवताचा (Weed Control) प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे पिकांचे तर नुकसान होतेच शिवाय हे गवत (Gajar Gavat Control) जनावरांच्या खाण्यात आल्यास त्यांना सुद्धा वेगवेगळे आजार होतात किंवा विषबाधा होऊ शकते.
गाजर गवताचे शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टिरोफोअर्स (Parthenium hystirophores) असे आहे. याला काँग्रेस गवत, पांढरफुली, चटकचांदणी अशा नावांनी सुद्धा ओळखले जाते. गाजर गवत नियंत्रणाचे वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी आज आपण गाजर गवत नियंत्रणाची (Gajar Gavat Control) जैविक पद्धती जाणून घेणार आहोत, आणि ती म्हणजे मेक्सिकन भुंग्यांचा (Mexican Beetles) वापर.
मेक्सिकन भुंगेमार्फत गाजर गवत निर्मूलन (Gajar Gavat Control)
मेक्सिकन भुंगे ज्यांना झायगोग्रामा बायकोलरॅटा या नावाने सुद्धा ओळखतात. या किडीचे प्रौढ भुंगे मळकट पांढरे असून त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. मादी भुंगे अलग अलग अथवा गुच्छात पानाच्या खालील बाजूवर अंडी घालतात.
अंड्यातून बाहेर निघालेल्या अळया गाजर गवताच्या वरील भागातील पाने खातात. अळीच्या 4 अवस्था असून पूर्ण वाढलेल्या अळया रंगाने पिवळ्या असतात. अळी अवस्था 10 ते 11 दिवसांची असते, कोषावस्था 9 – 10 दिवसांनी असते. कोषावस्थेत मातीत गेलेले भुंगे जमिनीतून निघून गाजर गवताच्या पानावर उपजीविका करतात (Gajar Gavat Control). तरुण अळया झाडाची वाढ व फुले येण्याचे थांबवितात.
पावसाळ्यात (Rainy Season) जून ते ऑक्टोबर पर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त (Gajar Gavat Control) करतात. नोव्हेंबर नंतर हे भुंगे जमिनीत 7 ते 8 महिने दडून बसतात आणि पुढील वर्षी सुरुवातीच्या पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. हे भुंगे एखाद्या ठिकाणी स्थिर झाले की पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा भुंगे सोडण्याची गरज पडत नाही.
भुंगे कोठे व किती सोडावेत
शेतात प्रति हेक्टरी 500 भुंगे सोडावेत. मनुष्यप्राण्याचा अडथळा / शिरकाव नाही, अशा जागी भुंगे सोडणे योग्य असते. प्रभावी नियंत्रणासाठी रेल्वे व राज्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने पडीक जमिनीत, बसस्थानकाजवळीत मोकळ्या जागेत सोडावे.
भुंगे दिवसा कार्यरत असल्यामुळे जमा करणे योग्य नाही. सकाळी अथवा सायंकाळी भुंगे जमा करण्यास योग्य काळ आहे. यावेळी मेक्सिकन भुंगे गोळा करून इच्छित स्थळी किंवा शेतात सोडावे.
प्रयोगशाळेत प्लास्टिकच्या 6 x 9 इंच आकाराच्या डब्यात. शेतात 10 x 10 फुट अथवा 10 x 15 फुट आकाराच्या मच्छरदाणीत कृत्रिमरित्या गाजर गवतावर भुंग्याने गुणन करतात.
नव्या जागी भुंगे सोडण्यासाठी कसे पाठवावे
भरपूर भुंगे असलेल्या गवतावरील 500 – 1000 भुंगे 10 – 15 सें.मी. उंच प्लास्टिकच्या बाटलीत टोपणास जाळी असलेले झाकण लावावे. बाटलीत गाजर गवताचा पाला खाद्य म्हणून टाकावा.
भुंग्याचा इतर पिकांना व मानवाला उपद्रव होतो का?
जैविक कीड नियंत्रण संचालनालय बंगलोरच्या चाचणी नुसार हे मेक्सिकन भुंगे इतर पिकांना व मनुष्यप्राण्याला सुरक्षित आहेत. भुंगे व अळया फक्त गाजर गवतच खातात. गाजरगवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमिनीत सुप्तावस्थेत जातात.
रासायनिक तणनाशकांऐवजी मेक्सिकन भुंग्यांचा वापर हा आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूप फायद्याचा आहे. तसेच गाजरगवत हे विषारी असल्याने ते उपटण्यासाठी मजूर वर्ग सहज तयार होत नाही. त्यामुळे जैविक नियंत्रण (Gajar Gavat Control) अत्यंत महत्त्वाचे ठरते.