गोगलगाय नियंत्रण कसे करावे : पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आता कुठे पावसाने उघडीप देऊन पीक जोमात येत आहेत तोपर्यंतच गोगलगायी पिकांचा नासधूस करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. या गोगलगाय नष्ट कशा कराव्यात हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्याचे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोगलगायीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
गोगलगाय नियंत्रण कसे करावे?
यंदाच्या वर्षी पावसाने उघडीत दिल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ कोळपणी करणे गरजेचे आहे जेणेकरून मातीच्या वरच्या थरातील अंडी नष्ट होतील आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या गोगलगायीचा प्रादुर्भाव नियंत्रण ठेवण्यास मदत होईल असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (Agriculture News)
चालू हंगामामध्ये कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी गोगलगाय नियंत्रणाबाबत शेतीमध्ये विविध उपाययोजना केल्यामुळे सध्या गोगलगायींचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र आता दिलासा मिळाला असला तरी पुढील काळात गोगलगायीचा उद्रेक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकामध्ये कोळपणी करणे गरजेचे आहे. असे कृषी विभागाने सांगितले आहे. कोळपणी केल्याने तन नियंत्रणासह गोगलगायींची अंडी देखील नष्ट होतात त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल
सोयाबीनवर पिवळा मोझॅक विषाणूजन्य रोग पसरतो
सोयाबीनवर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग असून तो मूगबिन येलो मोझॅक या विषाणूमुळे होत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी या किटकाद्वारे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांचा काही भाग पिवळसर दिसतो तसेच पिकाची वाढ पूर्णपणे खुंटते. पाने सुरकुतून जातात त्याचबरोबर फुलांची आणि शेंगांची देखील संख्या कमी होते. सोयाबीनच्या उत्पन्नावर या रोगाचा देखील चांगला परिणाम होत आहे. त्यामुळे यासाठी देखील कृषी विभागाने काही पर्याय सुचवले आहेत ते जाणून घेऊयात.
शेतकऱ्यांनो जर तुम्हाला तुमच्या शेतातील झाडावर पिवळा मोझॅक रोगाचे लक्षण दिसत असेल तर लगेचच हे रोगग्रस्त झाड उपटून नष्ट करावे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर पिकांमधील बांधावरील तण नियंत्रण करणे देखील खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर पांढरी माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिवळे चिकट सापळे देखील सोयाबीन पिकात लावणे गरजेचे आहे. जर तुम्ही सोयाबीन मध्ये पायरेथ्राईड किटकनाशकाचा वापर करत असाल तर हा वापर टाळावा असे कृषी विभागाने म्हटले आहे.
तुमच्याही सोयाबीनवर अशाच प्रकारचे रोग पडले असतील तर तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहाय्यक मंडळ, कृषी अधिकारी त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा असे आव्हान देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
इथे चेक करा बाजार भाव
सध्या सोयाबीनला किती बाजार भाव मिळतोय हे चेक करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करावे लागेल. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये तुमच्या सोयाबीनचा बाजार भाव त्याचबरोबर अन्य शेतमालाचा बाजारभाव देखील पाहू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले हे हॅलो कृषीचे अॅप इंस्टॉल करा यामध्ये बाजार भाव सोबतच तुम्ही सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, हवामान अंदाज, सातबारा उतारा, जमिनीची मोजणी, अशा सर्व गोष्टींची माहिती मिळवू शकता तेही अगदी मोफत त्यामुळे लगेचच हे अँप इंस्टाल करा.