हॅलो कृषी ऑनलाईन : यवर्षींच्या ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ई -पीक पाहणी ऍप लॉन्च केले गेले. याच्या माध्यमातून राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी ई -पीक पाहणीची नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांसाठी अजून एक चांगली बाब म्हणजे आता शेतकऱ्यांना एकाच मोबाईलवरून ५० शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ २० शेतकऱ्यांच्या पिकांच्या नोंदी एका मोबाईलवरून करण्यात येत होत्या मात्र आता मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत.
स्वयंसेवकांची घेतली जाणार मदत
महत्वाची बाब म्हणजे यासाठी आता स्वयंसेवकांचे मदत घेतली जाणार असून अशा स्वयंसेवकांची यादीचअप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्याकडून मागवली असल्याने आता रब्बी हंगामाची इ पीक पाहणी वेगाने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अगोदर पिक पाहणी मध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार, तलाठ्यांची मनमानी आणि चुकीची आकडेवारी यामुळे शासकीय यंत्रणा कायमच टीकेचे धनी होत होती. यावर पर्याय म्हणून शासनाने ईपीक पाहणी ची नोंदणीप्रकल्प सुरू केला.यामध्ये शेतकरी स्वतः आपल्या पिकांचीमोबाईल द्वारे एक पाहणी नोंदवू शकतात. व शेतकऱ्यांनी नोंदवलेली पीक पाहणी ला तलाठी आणि मंडळ अधिकारीत्यांच्याकडून मान्यता दिली जाते.खरीप हंगामात यशस्वी ठरलेलीई पीक पाहणी आता रब्बीमध्ये ही केली जाणार आहे.यासाठी स्वतः अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे स्वयंसेवकांना फोन करूनत्यांचे कामकाज याबाबतची माहिती विचारून खात्री करणार आहेत.जेणेकरून अत्यंत पारदर्शकपणे होईल.आता एकच मोबाईल द्वारे 50 शेतकऱ्यांचे पीक पाहणी करता येण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळेस्वयंसेवकांची संख्या कमी होईल. गावनिहाय निवडण्यात येणार्या स्वयंसेवकांची यादी आता नाशिक अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी मागवली आहे.
संदर्भ : दिव्य मराठी