चांगली बातमी…! ‘या’ बाजारसमितीत कांदा विक्रीचे रोख पैसे बाजार समिती कार्यालयातच मिळणार

onion
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या लाल कांद्याची चांगली आवक राज्यातल्या विविध बाजारसमित्यांमध्ये होताना दिसत आहे. आपल्या मालाची रक्कम वेळेवर आणि सोप्या पद्धतीने मिळाली की शेकऱ्याच्या कष्टाचे चीज होते. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल जाणणारा निर्णय देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या देखरेखेखाली कांदा विक्रीचे पैसे रोकड देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेल्या या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत केले जात आहे. यापूर्वी देवळा बाजार समितीत याआधी देखील कांदा विक्री केल्यानंतर 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे देण्यात यावे असा निर्णय घेतला गेला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी पाहिजे तशी बघायला मिळत नव्हती. ही बाब कालांतराने प्रशासनाच्या लक्षात आली, शिवाय शेतकरी देखील याबाबत तक्रार करीत नव्हते. मात्र याचा परिणाम बाजार समितीत होणाऱ्या कांद्याच्या आवकेवर होत होता. बाजार समितीत कांदा विक्रीचे पैसे वेळेत मिळत नाही अशी वार्ता वेगाने पसरली. शेवटी बाजार समितीने स्वतः लक्ष घालून यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर बाजार समितीचे सभापती आहेर यांच्या अध्यक्षतेखाली 31 डिसेंबर रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे सर्व पैसे रोकड स्वरूपात दिले जावेत असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मात्र शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय याचा आवकेवरही परिणाम होईल हे निश्चित.