हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीची आता बाजारात आवक होऊ लागली आहे. मात्र सध्या म्हणावे तसे दर तुरीला मिळत नाहीयेत राज्यातील कारंजा ,यवतमाळ ,लातूर, हिंगोली , जालना अशा काही बाजारपेठेत तुरीला कमाल भाव हमीभाव केंद्रांपेक्षा जास्त मिळत आहे. मात्र सर्वसाधारण दर हे 5900 ते सहा हजार तीनशे रुपयांच्या दरम्यानच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असल्याने अद्यापही शेतकरी तूर साठवणुकीला पसंती देत आहेत.
एक ते दीड महिन्यानंतर तुरीच्या दरात वाढीची शक्यता
देशात यंदा लहरी हवामानामुळे तुरीच्या उत्पादनात घट झाली आहे तर दुसरीकडे मात्र विक्रमी आयात झाल्याने सध्या म्हणावे तसे दर तुरीला मिळत नाहीयेत. मात्र जसजसे उत्पादन घटीचे चित्र स्पष्ट होईल तसे तुरीच्या दरात देखील सुधारणा होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. देशात यंदा तूर उत्पादन कमी होऊन 30 ते 33 लाख टनांच्या दरम्यान राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. मात्र उत्पादन घटूनही आयातीमुळे दर दबावात आहेत. परंतु देशात उत्पादन घटल्याने आयात दारही कमी दरात तुर विक्री करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे एक ते दीड महिन्यानंतर तुरीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे असं जाणकारांचं मत आहे.
दर कमी असण्याची कारणे
–बाजारात सध्या हळूहळू तुरीची आवक वाढत आहे मात्र तूर डाळीला उठाव कमी राहत असल्याने डाळ मिलची खरेदी सामान्य आहे.
— निर्यातदार देशांमध्ये कमी उपलब्धता असल्याने आयात कमी प्रमाणात होत आहे.
— सध्या आयात तुरीचे दर देशातील पूर्वीपेक्षा कमी आहेत म्हणून या तुरीला मागणी आहे.
— निर्यातदार जुन्या मालाची विल्हेवाट लावत आहेत.
— देशात चालू वित्तीय वर्षात नऊ महिन्यात 5.82 लाख टन तुरीची आयात झाली आहे. यंदा तूर आयातीचा दबाव बाजारावर दिसत आहे.
संदर्भ : ऍग्रोवन