हॅलो कृषी ऑनलाईन: सामान्यतः कमी पावसाच्या प्रदेशात डाळिंबाच्या हस्त बहार (Hast Bahar In Pomegranate) घेणे योग्य समजले जाते. परंतु परतीचा पावसामुळे या बहाराच्या नियोजनामध्ये अडसर निर्माण होऊ शकते. यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. डाळिंब (Pomegranate) हस्त बहारातील ताण सोडणे (Water Stress In Pomegranate) आणि बहार नियमन (Hast Bahar In Pomegranate) यावेळी कसे नियोजन करावे याविषयी जाणून घेऊ या महत्वाची माहिती.
डाळिंब हस्त बहार नियोजन (Hast Bahar In Pomegranate)
- पावसाळा संपल्यानंतर बागेला 20-25 दिवस पाणी देऊ नका. बागेला खताची मात्रा देताना फळबागांमध्ये पडलेली पाने, काडीकचरा काढून टाकावा, अथवा जमिनीत गाडून टाकावा.
- बागेतील झाडांना बसलेल्या ताणाच्या तीव्रतेनुसार इथेफॉनचा वापर करून पानगळ (defoliation) करावी.
- बेमोसमी पाऊस किंवा इतर कारणांमुळे झाडांवर योग्य ताण बसला नसल्यास इथेफॉनच्या (39 एसएल) दोन फवारण्या कराव्यात.
- पहिली फवारणी 0.9 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे तर दुसरी फवारणी 5 ते 8 दिवसांनी पानांच्या पिवळेपणा नुसार 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे करावी.
- प्रत्येक इथेफॉन फवारणीमध्ये 12-61-0 किंवा 0-52-34 (5 ग्रॅम प्रति लिटर पाणी) मिसळून फवारणी करावी.
- झाडांना योग्य ताण बसला असल्यास पाने पिवळी असताना इथेफॉन (39 SL) 1 मिली प्रति लिटर पाणी + 12-61-0 किंवा 0-52-34 @ 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- फांद्यांची घनता जास्त असल्यास, हवा खेळती राहण्यासाठी व सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी पेन्सिल आकाराच्या फांद्या शेंड्याकडून 10 ते 15 सें.मी. कट करून हलकी छाटणी (Pruning) करावी. खोडापासूनचे फुटवे (Pomegranate Water Shoot Removal) काढावेत.
- पाऊस थांबल्यानंतर आणि हवामान स्वच्छ झाल्यानंतरच कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची फवारणी (Pesticides And Fungicides Spray) करावी.