Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

Havaman Andaj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Havaman Andaj : पुढील 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, गोवा या भागात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. यामध्ये विशेषतः मराठवाडा भागात पाऊसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. मात्र पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.

उत्तर कर्नाटक ते दक्षिण छत्तीगडपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच उत्तर कर्नाटकवर एक चक्रीय स्थिती आहे, तसेच पुढील 24 तासात बंगालचा उपसागर आणि म्यानमारच्या किनाऱ्याजवळ उत्तर अंदमान समुद्रात एक चक्रिय स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तासात त्याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे.

आज (27) राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत (ऑरेंज अलर्ट) जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत (यलो अलर्ट) जोरदार पाऊस पडण्याचा इशारा आहे.
तसेच पालघर, मुंबई, नगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्यांत विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.