राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज

heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना अद्यापही उष्णतेपासून सुटका मिळालेली नाहीये. दरम्यान महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय आज मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तसेच दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जनेची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.आज दिनांक 6 मे रोजी अकोला, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

इतर राज्यांचा विचार करता राजस्थानात सात ते नऊ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. दक्षिण हरियाणा, दिल्ली दक्षिण पश्चिम उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि विदर्भात आठ आणि नऊ मे रोजी भारतीय हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. IMD नुसार, आज उत्तर भागात तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि दिल्लीतही आज कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. याशिवाय गुजरातमध्ये कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. जर आपण उर्वरित राज्यांबद्दल बोललो तर आज भोपाळ, डेहराडून आणि जयपूरमध्ये या सर्व राज्यांमध्ये किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस राहील. पण जम्मूमध्ये अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे, किमान तापमान २१ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील.

या भागात पावसाची शक्यता

मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम, उत्तर राजस्थान, हरियाणा तसेच दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार आणि झारखंड राज्यात धुळीच्या वादळासह पाऊस पडू शकतो, असेही हवामान खात्याचे म्हणणे आहे.