हॅलो कृषी ऑनलाईन: मॉन्सूनने महाराष्ट्रात (Rainfall In Maharashtra) जोरदार हजेरी लावली आहे. येत्या 5 दिवसांत, 5 ते 10 जुलैपर्यंत, मराठवाडाव्यतिरिक्त राज्याच्या अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ (Meteorologist) माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे.
कोणत्या भागात असणार पाऊस (Rainfall In Maharashtra)
- जोरदार ते अति जोरदार पाऊस (Heavy Rainfall): पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड, कोकण आणि विदर्भातील काही भाग- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
- मराठवाड्यात जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर मध्ये मध्यम पाऊस, छत्रपती संभाजीनगर आणि बीड मध्ये किरकोळ पाऊस. मराठवाडयात दिनांक 05 ते 11 जूलै व 12 ते 18 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त (Rainfall In Maharashtra) राहण्याची शक्यता आहे.
- कोकणातून सह्याद्रीवर चढलेला मॉन्सून सक्रिय झाल्याने धरणांमध्ये पाणी साठवण (Dam Water Storage) वाढण्याची शक्यता.
- जुलै महिन्यात नद्या खळखळून धरणात पाणी येण्याची शक्यता. पेरणी झालेल्या पिकांसाठी चांगल्या पावसाची गरज.
अति जोरदार पाऊस कधी?
देशाच्या मध्यावर स्थापित झालेला मुख्य मॉन्सून (Rainfall In Maharashtra) जोपर्यंत दक्षिणेला सरकत नाही तोपर्यंत नद्या खळखळून धरणात पाणी येणार नाही. जुलै महिन्यात ही शक्यता आहे.