राज्यात पावसाचा धुमाकूळ ; आजही ‘या’ भागात मुसळधार पावसाचा अंदाज

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणात जवळपास 10 ते 12 दिवसांपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलाआहे. येत्या रविवारपर्यंत कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत आहेत. आज गुरुवार आणि उद्या शुक्रवारी कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यात त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर ते पूर्व आणि मध्य भारतातून मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसर पासून अलिगड, जमशेदपूर या भागातून अग्नेय बंगालच्या उपसागरात पर्यंत सक्रिय आहे. मान्सून आज पश्चिम भाग उत्तरेकडे सरकत असून पुढील दोन दिवस तो उत्तरेकडे राहणार आहे. तर पूर्वेकडील भाग हा त्याच्या सर्वसाधारण स्थिती वर असणार आहे.

अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात पासून कर्नाटक पर्यंत विस्तारलाय. वरील हवामान स्थिती पावसाला पोषक ठरलीय. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आज राज्यात सर्वदूर हलका पाऊस पडत असताना हवेत गारवा तयार झाला. बुधवार दिनांक 21 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया ते 32 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

या ठिकाणी पडणार जोरदार पाऊस

22 जुलै गुरुवार – संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया.
23 जुलै शुक्रवार – संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, वाशिम, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ.
24जुलै शनिवार -संपूर्ण कोकण पुणे सातारा कोल्हापूर अकोला अमरावती.
25जुलै रविवार – ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर.

मागील २४ तासात अधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यांची आकडेवारी

मागील 24 तासात जालना जिल्ह्यातील मंठा येथे 80 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत 70 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण पावसाची आकडेवारी ही 505 पॉइंट 40 मिलिमीटर इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गगनबावडा इतर 265 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट तिथं सर्वाधिक 98 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. माथेरान येथे सर्वाधिक 331 पॉईंट 40 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 200 मिली मीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देवरूख येथे सर्वाधिक 252 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात सर्वाधिक 434 मिलिमीटर पावसाची नोंद जव्हार इथं करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात 226 मिलिमीटर पावसाची नोंद मुरबाड इथं करण्यात आली आहे