Sugarcane Rate: मराठवाड्यातील ‘तेरणा’ साखर कारखान्याने दिला उसाला सर्वाधिक दर! जाणून घ्या किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यावर्षी उसाला सर्वाधिक दर (Sugarcane Rate) मराठवाड्यातील सर्वात जुन्या तेरणा शेतकरी साखर कारखान्याने (Terna Sahakari Sakhar Karkhana) यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर (Sugarcane Rate) शेतकर्‍यांना दिला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर्स यूनिट क्रमांक 6 संचलित येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 या हंगामातील उसाला जिल्ह्यात सर्वाधिक 2 हजार 825 भाव (Sugarcane Rate) दिला. ऊस पुरवठादार शेतकर्‍यांच्या (Sugarcane Farmers) खात्यात ऊस बिलाची ही रक्कम जमाही करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांनी दिली.

मराठवाड्यातील (Marathwada Sugar Factory) पहिला व महाराष्ट्रातील दुसरा सहकारी साखर कारखाना असलेला ढोकी येथील तेरणा कारखाना मागील बारा वर्षांपासून बंद होता. कारखाना सुरू व्हावा यासाठी ढोकी व परिसरातील शेतकरी, कारखान्याचे सभासद, व्यापारी, कामगार यांनी तेरणा संघर्ष समिती स्थापना करून कोरोना काळात आंदोलने केली. यानंतर बँक प्रशासनाने हा कारखाना भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. यानुसार राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी भैरवनाथ शुगर्सकडे 25 वर्षे भाडे तत्त्वावर हा कारखाना चालवण्यास घेतला. कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांनी सहा महिन्यांत कारखान्याचे काम पूर्ण करून कारखाना सुरू केला.

दरम्यान, कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्ह्यात सर्वाधिक 2 हजार 825 रुपये प्रति टन दर देण्याची घोषणा केली होती. तेरणा कारखान्याने 20 नोव्हेंबर ते 20 मार्च 2023 या दरम्यान तब्बल 3 लाख 12 हजार 878 मेट्रिक टन उसाचे गाळप केले. गाळप केलेल्या या उसाचे बिलही शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर प्रति टन 2 हजार 825 रुपये या दराप्रमाणे (Sugarcane Rate) जमा करण्यात आले आहे. यामुळे शेतकर्‍यांतून (Farmers) समाधान व्यक्त होत आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.