हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय कृषी संशोधन परिषदने (ICAR) कापसाचे (New Cotton Varieties) चांगले उत्पादन देणारे 5 नवीन वाण बाजारात आणले आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत विविध संस्थांमध्ये हे वाण विकसित करण्यात आले आहेत. कापसाच्या या विविध जाती वेगवेगळ्या राज्यांसाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे. शेतकरी (Cotton Farmers) त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या क्षेत्रानुसार कापसाचे हे वाण निवडू शकतात. येत्या हंगामात कापूस लागवडीसाठी हे वाण शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात, असे सांगण्यात येत आहे, चला तर मग जाणून घेऊ या वाणांची (New Cotton Varieties) वैशिष्ट्ये आणि फायदे.
पीडीकेव्ही धवल (AKA-2013-8)
कपाशीची ही संकरित जात खरीप हंगामातील (Kharif Cotton Variety वेळेवर पेरणीसाठी योग्य आहे. ही जात AICRP, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, महाराष्ट्र यांनी सादर केली आहे. ही जात तुडतुडे या किडीस व जिवाणूजन्य करपा रोगास सहनशील आहे. याशिवाय ही जात पानांवरील ठिपके राखाडी बुरशी रोगाला सुद्धा प्रतिरोधक आहे. ही जात 160 ते 180 दिवसांत तयार होत असून 12.84 क्विंटल प्रति हेक्टरीपर्यंत उत्पादन (Cotton Yield) देते. कापसाच्या या जातीची (New Cotton Varieties) शिफारस महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांसाठी करण्यात आलेली आहे.
सीआयसीआर-एच बीटी कॉटन 40 (ICAR-CICR-PKV 081 Bt)
ही कापसाची संकरित जात (Hybrid Cotton Variety) आहे जी दक्षिण विभागासाठी शिफारस केली जाते. ही देखील खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आलेले वाण आहे. ही जात ICAR-सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूर, महाराष्ट्र दक्षिण विभाग यांनी सादर केली आहे. ही कापसाची जात जिवाणूजन्य करपा, राखाडी बुरशी, पानावरील ठिपके यांसारख्या रोगांना प्रतिरोधक (Disease Resistant Cotton Variety) आहे. सोबतच ही जात तुडतुडे, मावा, फुलकिडी नाकतोडे या किडींना देखील सहनशील (Pest Resistant Cotton Variety) आहे.
शालिनी (CNH 17395) (CICR-H कॉटन 58)
ICAR सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिटय़ूट, नागपूर (CCRI Nagpur) महाराष्ट्राने सादर केलेला हा कापसाचा संकरित वाण आहे. हा कापूस वाण (New Cotton Varieties) पावसावर अवलंबून असलेल्या खरीप परिस्थितीसाठी योग्य आहे. ही जात फुसेरियम विल्ट म्हणजेच मर रोगास प्रतिरोधक आहे व मावा किडीसाठी मध्यम सहनशील आहे. कापसाची ही जात 127 दिवसात तयार होते. या जातीची उत्पादन क्षमता 14.41 क्विंटल प्रति हेक्टर आहे. या जातीमध्ये तेलाचे प्रमाण 34.3 टक्के जास्त आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांसाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
सीआयसीआर-एच बीटी कॉटन 65 (ICAR-CICR 18 Bt)
ही संकरित जात ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च, नागपूर, महाराष्ट्र यांनी प्रसारित केली आहे. या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे हा वाण (New Cotton Varieties) पावसावर अवलंबून असलेल्या परिस्थितीसाठी योग्य आहे. हे वाण मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, या किडींना सहनशील असून जीवाणूजन्य करपा, केवडा, अल्टरनेरिया लीफ ब्लाइट, राखाडी बुरशी यांना प्रतिरोधक आहे. ही जात विशेषतः मध्य विभागासाठी शिफारस केली जाते. या जातीपासून 15.47 क्विंटल प्रति हेक्टरी कापसाचे उत्पादन घेता येते. ही जात 140 ते 150 दिवसांत तयार होते.
सीएनएच -18529 (CICR-H NC कॉटन 64)
कापसाची ही संकरित जात (New Cotton Varieties) ICAR-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, महाराष्ट्र यांनी विकसित केली आहे. हे वाण मध्य विभागासाठी पावसावर आणि सिंचनासाठी योग्य आहे. ही जात 160 ते 165 दिवसांत तयार होते. या जातीचा रंग तपकिरी आहे. ही जात हातमाग विणकामासाठी योग्य आहे. ही जात रसशोषक किडी, बोंडअळी यांना सहनशील आहे. तर हे अल्टरनेरिया पानांचे ठिपके, जिवाणूजन्य रोग, पानावरील ठिपके रोगांना प्रतिरोधक आहे. कापसाच्या या जातीपासून हेक्टरी 10.11 क्विंटल उत्पादन मिळू शकते. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.