हॅलो कृषी ऑनलाईन: खत खरेदी (Identification Of Real Fertilizer) करताना शेतकऱ्यांना बरेचदा फसवणुकीचे अनुभव येतात. शेतकऱ्यांना खत म्हणून बरेचदा माती सुद्धा विकली जाते. यामुळे त्यांचे कष्टाचे पैसे वाया तर जातातच शिवाय पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बाजारात बनावट खते (Bogus Fertilizer) मिळत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीची चिंता असते. पण घाबरू नका आज आम्ही तुमच्यासाठी अस्सल डीएपी खत (DAP Fertilizer) ओळखण्याच्या काही उत्तम पद्धतींची (Identification Of Real Fertilizer) माहिती घेऊन आलो आहोत. जेणेकरून खताचे खरे स्वरूप जाणून घेऊन तुम्ही तुमचे पीक दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकाल. खतामुळे (Fertilizers) पिकांची चांगली वाढ होऊन जमिनीची सुपीकता राखण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. डीएपी खताचा पिकामध्ये योग्य वापर केल्यास झाडांची वाढ झपाट्याने होऊ लागते.
बाजारात अनेक प्रकारची डीएपी खते उपलब्ध असल्याने खरी आणि बनावट खते शेतकऱ्यांना ओळखता येत नाहीत. आज आम्ही तुम्हाला डीएपी म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट खत खरेदी करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात हे सांगणार आहोत. जेणे करून तुम्ही फक्त अस्सल डीएपी खत (Identification Of Real Fertilizer) खरेदी करू शकाल याबद्दल माहिती सांगणार आहोत.
अस्सल डीएपी खताची ओळख खालीलप्रमाणे करा (Identification Of Real Fertilizer)
• मूळ डीएपी खते दाणेदार असतात आणि दाणे कडक असतात.
• डीएपी खताच्या दाण्यांचा रंग तपकिरी, काळा आणि बदामासारखा दिसतो.
• मूळ डीएपी खत नखांनी तोडणे फार कठीण आहे.
• अस्सल डीएपी खताला तीव्र गंध असतो. त्यामुळे दुकानातून डीएपी खत खरेदी करताना ते खत हातात कुस्करून घ्या आणि नंतर त्याचा वास घ्या.
• डीएपी खताचे दाणे गरम केल्यावर ते फुगतात.
डीएपी खत खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
- खत खरेदी करताना शेतकर्याने विक्रेत्याकडून वैध पावती घ्यावी. जेणेकरून फसवणूक झाल्यास बनावट खताबाबत तक्रार करता येईल.
- शेतकर्यांनी नेहमी खते, आणि बियाणे नोंदणीकृत दुकानातूनच खरेदी करावे.
- POS मशिनमधून खत घेतानाही, तुम्हाला कन्फर्म पावती घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला अंगठ्याच्या ठशाची पावती मिळेल.
डीएपी खताची किंमत किती आहे?
भारतीय बाजारपेठेत डीएपी खताची किंमत प्रति बॅग 1,350 रुपयांपर्यंत आहे. ही किंमत राज्यानुसार बदलू शकते. त्याचप्रमाणे म्युरेट ऑफ फॉस्फेट (एमओपी) खताच्या एका पिशवीची बाजारात किंमत 1,670 रुपयांपर्यंत आहे. याशिवाय नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमच्या एनपीके खताच्या एका पोत्याची किंमत सुमारे 1,470 रुपये आहे.