हॅलो कृषी ऑनलाईन: कमी कालावधी, चांगले उत्पादन (Soybean Cultivation) आणि मिळणारा भाव यामुळे सोयाबीन खालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात सोयाबीन हे प्रमुख खरीप पिकांपैकी एक आहे. सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित पद्धतीने लागवड (Soybean Cultivation) करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ याबाबत सविस्तर माहिती
सोयाबीनची सुधारित लागवड (Soybean Cultivation)
पूर्वमशागत: जमिनीची एक खोल नांगरट करून उभ्या आडव्या दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
पेरणी व लागवडीचे अंतर: पेरणी (Soybean Sowing) खरीपात 15 जून ते 15 जुलै या दरम्यान करावी.15 जुलै नंतर शक्यतो पेरणी करणे टाळावे.कमीतकमी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी यापेक्षा कमी पाऊस पडल्यास पेरणी करू नये.पेरणी करताना जमिनीत किमान सहा इंचा पर्यंत ओल असावी.
- भारी जमिनीत पेरणी 45 सें. मी. x 5 सें.मी.
- मध्यम जमिनीत 30 सें.मी. x 10 सें.मी. अंतरावर करावी.
- हलक्या जमिनीत सोयाबीनची पेरणी (Soybean Cultivation) 5 सेंमी खोलीपर्यंत करू शकतो, परंतु भारी जमिनीमध्ये सोयाबीनची पेरणी 3 सेंमी पर्यंत करावी.
बियाणे: जर घरगुती बियाणे (Soybean Seed) वापरावयाचे असेल तर पेरणी करण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता करून पहावी जर 70 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमता असेल तर ते बियाणे म्हणून पेरणीस वापरावे, जर उगवण क्षमता 60 टक्के असल्यास 10 टक्के अधिक बियाणे वापरावे.
प्रति एकरी बियाण्याचे प्रमाण:
•पेरणीसाठी 30 किलो
•बीबीएफ यंत्राद्वारे 22 किलो
•टोकण पद्धतीसाठी 16 ते 18 किलो
बीजप्रक्रिया (10 किलो बियाण्यासाठी): बीजप्रक्रिया (Soybean Seed Treatment) करताना सगळ्यात अगोदर बुरशीनाशकाची नंतर कीटकनाशकाची व शेवटी जैविक खताची बीजप्रक्रिया करावी.
- चारकोल रॉट, कॉलर रॉट व रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण करण्यासाठी कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5% WS – 30 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया करावी.
- खोडमाशीसाठी थायोमेथोक्झाम 30% FS (100 मिली) + गरजेनुसार थोडे पाणी यांची बीजप्रक्रिया करावी.
- जैविक बीजप्रक्रिया: 250 ग्रॅम रायझोबियम + 250 ग्रॅम पीएसबी + 250 ग्रॅम केएसबी
आंतरपीक: आंतरपीक (Soybean Intercropping) पद्धतीसाठी सोयाबीन (Soybean Cultivation) अतिशय उत्कृष्ट पीक आहे.
सिंचन व्यवस्था उपलब्ध असल्यास ऊस, मका आणि कापूस या पिकांबरोबर 4:2 या गुणोत्तरानुसार सोयाबीन आंतरपीक म्हणून घ्यावे.सोयाबीन + तूर 3:1 या प्रमाणात घ्यावे.
आंतरमशागत (Soybean Cultivation)
•आवश्यकतेनुसार सोयाबीन मध्ये दोन कोळपण्या कराव्यात.
•पहिली कोळपणी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी तर दुसरी कोळपणी पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी करावी. तसेच आवश्यकतेनुसार एक ते दोन हात खुरपणी कराव्या.
•सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना आंतरमशागत करू नये. अपवादात्मक परिस्थितीत पिकाची कायिक वाढ जास्त झाल्यास वाढ रोधकाची फवारणी करावी
पाणी व्यवस्थापन (Soybean Water Management)
•सोयाबीन (Soybean Cultivation) हे खरीप हंगामातील पीक आहे त्यामुळे त्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नाही परंतु सोयाबीनच्या काही संवेदनशील अवस्थेत पावसाने ताण दिल्यास खालील अवस्थेत पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
•पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी)
•पीक फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी)
•शेंगा भरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर 60 ते 70 दिवसांनी)
खत व्यवस्थापन (Soybean Fertilizer Management)
•चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 12 ते 15 टन वापरावे
•सोयाबीन पीक (Soybean Cultivation) द्विदल वर्गीय असल्यामुळे संपूर्ण रासायनिक खताची मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी.
•युरिया 43 किलो + सिंगल सुपर फास्फेट 187 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 29 किलो प्रति एकरी पेरणीच्या वेळी द्यावे
•खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे अथवा दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून घ्यावे
•गंधक 10 किलो प्रति एकरी वापरावे त्यामुळे सोयबींन मधील तेलाचे प्रमाण वाढून इतर अन्नद्रव्य उपलब्ध होण्यास मदत होते.
•खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यास 1 टक्के नायट्रेटची पहिली फवारणी 35 व्या दिवशी व 2 टक्के पोटॅशियम नायट्रेटची दुसरी फवारणी 55 व्या दिवशी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
काढणी (Soybean Harvesting)
सोयाबीनची (Soybean Cultivation) काढणी जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार 100 ते 110 दिवसांत करावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास सुरुवात होते.
सोयबिन पिकाचे उत्पादन 20-25 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.