हॅलो कृषी ऑनलाईन: 2023 मध्ये जागतिक कृषी निर्यातीत (Global Agriculture Export) घसरण होऊनही भारताने (India) वर्षभरात जगातील आठव्या क्रमांकाचा कृषी उत्पादनांचा निर्यातदार म्हणून आपले स्थान कायम राखले आहे अशी माहिती जागतिक व्यापार संघटनेने (WTO) दिली आहे. 2022 साली भारताची निर्यात 55 अब्ज डॉलर होती ती 2023 साली घसरून 51 अब्ज डॉलर इतकी झाली. कृषी निर्यातीत घसरण होऊनही आठव्या क्रमांकावर स्थान राखण्याचे (Global Agriculture Export) कारण म्हणजे पहिल्या दहा देशांपैकी सात देशांनी एकत्रित केलेल्या निर्यात आकडेवारीत घट झाली आहे.
कृषी उत्पादनांच्या प्रमुख निर्यातदारांपैकी (Main Global Agriculture Export Countries) ब्राझील, युरोपियन यूनियन आणि थायलंड यांनी 2023 मध्ये त्यांची निर्यात अनुक्रमे 6 टक्के, 5 टक्के आणि 0.2 टक्क्यांनी वाढवली. पहिल्या 10 मधील इतर सात अर्थव्यवस्थांनी त्यांच्या कृषी निर्यातीत घट केली. शीर्ष दहा निर्यातदारांनी 2023 मध्ये जागतिक निर्यातीत (Global Agriculture Export) 71.9 टक्के वाटा दर्शविला.
भारतातील कृषी निर्यात (Global Agriculture Export) कमी होण्याचे कारण भू-राजकीय घटक जसे की लाल समुद्राचे संकट आणि रशिया-युक्रेन युद्ध हे आहे. परंतु ही घसरण मुख्यत्वे तांदूळ, गहू, साखर आणि कांदे यांसारख्या नियमन केलेल्या वस्तूंमध्ये होती, असे भारतातील अधिकाऱ्यांनी यापूर्वी निदर्शनास आणून दिले.
भारताने मे 2022 मध्ये गहू, जुलै 2023 मध्ये बिगर बासमती तांदूळ आणि ऑक्टोबर 2023 पासून साखरेच्या निर्यातीवर बंदी (Export Ban) घातली होती.
युरोपियन यूनियनने (EU) 2022 मधील $799 अब्ज डॉलरच्या तुलनेत 2023 मध्ये 836 अब्ज डॉलर मूल्याच्या कृषी उत्पादनाची निर्यात करून आपले अव्वल स्थान कायम राखले. 2023 मध्ये कृषी निर्यातीत $222 अब्ज डॉलर्सच्या विरूद्ध $198 अब्जपर्यंत घसरण होऊनही अमेरिका दुसर्या क्रमांकावर कायम आहे.
ब्राझीलची कृषी निर्यात (Brazil Agriculture Export) 2022 मधील $148 बिलियन डॉलरच्या तुलनेत 2023 मध्ये $157 अब्ज डॉलर वाढली त्यामुळे या देशाचे तिसरे स्थान कायम आहे.
2023 मध्ये चीन हा चौथा सर्वात मोठा कृषी निर्यातदार (Global Agriculture Export) होता ज्याची शिपमेंट $95 अब्ज होती जी 2022 मध्ये $96 अब्जच्या निर्यातीपेक्षा किरकोळ कमी होती.
टॉप टेन कृषी निर्यातदारांमध्ये कॅनडा, मेक्सिको, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे.