शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार वाढ; मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी लॉन्च केला नवा प्लॅटफॉर्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने एक डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मचा नाव ‘किसान सारथी’ असे आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांना पीक व इतर बाबींची माहिती दिली जाणार आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकत्रितपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘किसान सारथी’ डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांसाठी लॉन्चिंग केलं.

यावेळी बोलताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी थेट वैज्ञानिक आणि तज्ज्ञांकडून शेती व त्या संबंधित क्षेत्रातील वैयक्तिक सल्ला घेऊ शकतात. शेतकऱ्यांचे धान्य त्यांच्या शेतात गोदाम बाजारपेठेत आणि इतर ठिकाणी पोहोचवण्याच्या क्षेत्रात नवीन तांत्रिक हस्तक्षेपांवर संशोधन केले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल सहज विकू शकतील. असे मंत्री वैष्णव यांनी सांगितलं.

Kisan sarthi चे फायदे

— ‘किसान सारथी’ या डिजिटल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलं पीक घेता येईल.
— योग्य प्रमाणात उत्पादन आणि अनेक इतर मूलभूत गोष्टींची माहिती मिळू शकेल.
— शेतकऱ्यांना पिकांशी संबंधित कोणतीही माहिती थेट वैज्ञानिक तज्ज्ञांकडून कडून डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे मिळू शकते.
— शेतकरी हे शेतीच्या नवनवीन पद्धती या प्लॅटफॉर्म द्वारे शिकू शकतात.