उन्हाळी भुईमुगात रसशोषक किडींचा प्रादूर्भाव, वावरातल्या इतर पिकावरही कीड ; काय कराल उपाय, वाचा तज्ञांचा सल्ला

peanut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचीत घट होईल व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 18 व 19 फेब्रुवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहील.मागील आठवडयात पिकास पाणी दिल्यामूळे जमिनितील ओलावाही वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. परभणी जिल्हयातील पालम, मानवत व गंगाखेड तालूक्यात पिकास पाणी देण्याची आवश्यकता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 20 ते 26 फेब्रूवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

रब्बी ज्वारी : उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी भुईमूग: वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 6 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 3 मिली (संयूक्त किटकनाशक) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.

करडई : करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी : केळी बागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी पिकात घडांना काठीने आधार द्यावा. बागेतील वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
आंबा : आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एनएए 10 पीपीएम (प्लॅनोफिक्स 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

टोमॅटो पिकावरील फळ पोखरणा-या अळीच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस 25% 20 मिली ‍किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा इन्डोक्झाकार्ब 14.5% एससी 10 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.