हॅलो कृषी ऑनलाईन: कापूस पीक (Sucking Pest On Cotton) पेरणी होऊन 15 दिवसाच्या वर झाले आहे. किंवा काही शेतकर्यांची पेरणी अंतिम टप्प्यात असेल. कापूस पिकावर मावा (Aphids), तुडतुडे (Jassids), फुलकिडी (Thrips), पिठ्या ढेकूण (Mealy Bug) यासारख्या रस शोषणाऱ्या किडींचा (Sucking Pest On Cotton) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो. जाणून घेऊ या कपाशीवरील रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण (Integrated Management).
यांत्रिक पद्धत
- शेताचे नियमित निरीक्षण करावे.
- रसशोषक किडींचा (Sucking Pest On Cotton) प्रादुर्भाव झालेली गळालेली पाते आणि बोंडे जमा करून नष्ट करावीत.
- शेताची कोळपणी व खुरपणी किंवा रासायनिक तणनाशकाचा वापर करून पिकाच्या सुरुवातीची 8 ते 9 आठवडे तणांचे व्यवस्थापन करावे.
- पीक 20 दिवसाचे झाल्यावर शेतात पिवळे निळे चिकट सापळे लावावेत (Sticky Traps). एक हेक्टरसाठी 15 पिवळे व 5 निळे सापळे लावावे.
मशागतीय पद्धती
- नत्र खताचा अतिरिक्त वापर टाळावा.
- शिफारशीनुसार दोन ओळीतील व दोन रोपांतील अंतर ठेवावे.
- मित्र कीटकांचे संवर्धन (Conservation Of Beneficial Insects) होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यासारखी आंतरपिके, मिश्र पिके घ्यावीत.
- कपाशी पिकाभोवती झेंडू आणि एरंडी या सापळा पिकांची (Trap Crop) एक ओळ कडेने लावावी.
जैविक पद्धती
- ढाल किडा म्हणजेच लेडीबर्ड बीटल (Lady Bird Beetle) या कीटकाचे प्रौढ व त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर (Sucking Pest On Cotton) जगतात. लेडी बर्ड बीटल पुरेशा प्रमाणात आढळून आल्यास रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा.
- सिरफीड माशी, पेंन्टाटोमीड ढेकूण, कातीन, भुंगे, ड्रॅगनफ्लाय, रॉबर माशी, गांधील माशी, प्रार्थना कीटक, टॅकनिड माशी इ. मित्र किटकांचे संवर्धन करावे.
- 5% निंबोळी अर्काची (Neem Ark) किंवा अॅझाडिरेक्टीन दहा हजार पीपीएम 10 मिली किंवा 1500 पीपीएम 25 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पिठ्या ढेकणासाठी (Mealy Bug) व्हर्टिसिलीयम बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रण पद्धती
निंबोळी तेल (5%) 50 मिली किंवा
फ्लोनीकॅमीड (50WG) 2 ग्रॅम किंवा
डायफेन्थुरॉन (50 WP) 12 ग्रॅम किंवा
फिप्रोनील 5 एस सी 30 मिली किंवा
पायरीप्रोक्झीफेन (5%) + डायफेन्थुरॉन (25% SE) 20 मिली
वरीलपैकी कोणत्याही किडनाशकांची दिलेल्या प्रमाणात प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.