हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय (Iron In Animal Feed) म्हणून पशुपालन (Animal Husbandry) करतात. या व्यवसायामध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी तसेच जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यामध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे आहार. जनावरांच्या आहारात (Animal Feed) वेगवेगळी जीवनसत्वे वेगवेगळी कार्ये करतात. आज आपण जनावरांच्या आहारातील लोह (Iron In Animal Feed) या जीवनसत्त्वाचे महत्व आणि ते कसे देता येईल याबद्दल जाणून घेऊ या.
जनावरांच्या आरोग्यात लोहाचे महत्व (Importance Of Iron In Animal Feed)
जनावरांच्या आहारात लोहाचा वापर असणे गरजेचे असते. महत्त्वाचे म्हणजे जनावरांच्या शरीरातील लोहाची पातळी केवळ शोषणाद्वारे नियंत्रित केली जाते. जनावरांच्या शरीरातील लोह उत्सर्जनाची यंत्रणा ही एक अनियंत्रित प्रक्रिया आहे जी घाम येणे, केस आणि त्वचेच्या पेशी गळणे आणि एन्टरोसाइट्सचे जलद उलाढाल आणि उत्सर्जन या द्वारे होते. जनावरांच्या शरीरात लोह (Iron In Animal Feed) खालील प्रमाणे महत्त्वाचे कार्य करते.
- लोह रक्तातील साखरेचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करते.
- लोह जनावरातील रोगप्रतिकारक शक्ती (Animal Immunity) वाढवते.
- निरोगी त्वचा, केस आणि नखांसाठी महत्त्वाचे आहे.
- लोह हे रक्त निर्मितीसाठी आवश्यक घटक आहे.
जनावरांच्या शरीरातील सुमारे 70 टक्के लोह रक्तातील हिमोग्लोबीन नावाच्या लाल रक्तपेशींमध्ये आणि मायोग्लोबिन नावाच्या स्नायूंच्या पेशींमध्ये आढळते. रक्तातील ऑक्सिजन फुफ्फुसातून उतींमध्ये हस्तांतरित करण्यासाठी हिमोग्लोबीन आवश्यक आहे.
जनावरांमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे जाणवणारी लक्षणे
- लोहाच्या कमतरतेमुळे रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये अत्यंत थकवा, अशक्तपणा येतो, त्वचा फिकट होते, छातीत दुखणे, जलद हृदयाचा ठोका होणे किंवा श्वास लागणे इत्यादी लक्षणे उद्भवतात.
- पाय थंड होणे, जिभेची जळजळ किंवा वेदना होणे, नखे ठिसूळ होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
- वराह व त्यांच्या पिल्लांना पिगलेट ॲनिमिया (Anemia) आजार होतो.
आहार व्यवस्थापन (Iron In Animal Feed)
- जनावराला खाद्यातून नियमित लोह युक्त क्षार मिश्रणे द्या. मोठ्या जनावरांत 50 ते 100 ग्रॅम, तर लहान जनावरांत 15 ग्रॅम ते 20 ग्रॅम हे प्रमाण ठेवा.
- जनावराला पालेदार चारा विशेषतः द्विदल चारा त्यांच्या वजनाप्रमाणे द्या.
- आहारात लोह असलेले पदार्थ जास्त खायला द्या.
- पशुआहारात जीवनसत्त्व ‘क’ असलेले अधिक अन्न पदार्थ समाविष्ट करा. कारण ते शरीरात लोह शोषण्यास मदत करते.